Thursday, March 28, 2024

लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मागील काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसली. याच दरम्यान ती कपिल शर्मासोबत खूप मजा करताना दिसून आली. कंगना तिच्या ‘थलायवी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या ठिकाणी आली होती. या चित्रपटात तिने अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली आहे. कंगना यापूर्वी अनेक वेळा कपिलच्या शोमध्ये गेली आहे. त्याचबरोबर तिच्या बिनधास्त बोलण्याने तिथल्या सर्वांना हैराण केलं आहे. कपिल शर्मा देखील आपल्या पाहुण्यांसोबत मजा करण्यात मागे हटत नाही. चित्रपटाबद्दल बोलताना कपिल शर्मा म्हणाला की, त्यांच्या संपूर्ण टीमने ‘थलायवी’ चा ट्रेलर पाहिला, आहे जो सर्वांना आवडला आहे.

कंगनाने शोमध्ये अनेक मोठे खुलासे ही केले, जे ऐकून चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. कपिलने कंगनाला तिचाच एक जुना व्हिडिओ दाखवला. जेव्हा ती शाहिदसोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. तेव्हा ती म्हणाली होती की, “सोशल मीडिया हे रिकामटेकडे लोक वापरतात.”

यावर कंगना म्हणाली की, “जेव्हा मी हे बोलले होते, तेव्हा मला खूप काम असायचे. पण लॉकडाऊन दरम्यान मी घरीच होते आणि त्यावेळी मी ट्विटर जॉईन केले. पण २०२१ मध्ये हे लॉकडाऊन उघडताच ट्विटरने माझ्यावर बंदी घातली. मला असेही वाटले की बरं झाला टेन्शन गेलं. पण त्या काळात माझ्याविरोधात दररोज २०० पेक्षा जास्त एफआयआर नोंदवले जात होते, ज्यामुळे हे सर्व घडले.”

यादरम्यान कंगना म्हणाली की, “होय, फक्त रिकामे लोक सोशल मीडियावर राहतात. जेव्हा लॉकडाऊन झाले होते तेव्हा मी सुद्धा रिकामीच होते. त्यामुळे मी सोशल मीडियावर आले. मग लॉकडाऊन उठवल्यापर्यंत, ट्विटरनेच माझे खाते बंद केले.” कंगना ट्विटरवर येऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिच्याबद्दल खूप गदारोळ झाला आणि नंतर ट्विटरने तिचे अकाउंट डिलीट केले. यानंतर कंगना आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि कु ऍप वापरते.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर कंगनाच्या ‘थलायवी’ या चित्रपटाला आतापर्यंत प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय कंगना ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटात दिसणार आहे. कंगना आणीबाणीवर एक चित्रपटही बनवत आहे. ज्यात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्लॅक ब्युटी!’ पूजा सावंतच्या काळ्या ड्रेसमधील फोटोंनी चुकवला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका

-तेजश्री प्रधानच्या सौंदर्याने घातली चाहत्यांना भुरळ, खण पैठणीतील फोटो होतोय व्हायरल

-सोशल मीडियावर पुन्हा एकदा सई लोकुरचा जलवा, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा दिलखेचक अंदाज

हे देखील वाचा