दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमारने २९ ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी तो जग सोडून जाणे त्याच्या चाहत्यांना सहन होत नाहीये. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली. अशा परिस्थितीत आता त्याच्या मृत्यूच्या १६ दिवसांनंतर एका वृद्ध महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बसवर तिच्या आवडत्या स्टारचा फोटो पाहून ती भावूक झाली आहे आणि फोटोवर डोके ठेवून रडत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुनीतचा फोटो बसवर असल्याचे दिसत आहे आणि गरीब वृद्ध महिला त्याला पाहण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. ती त्याच्या फोटोवर आधी डोके ठेवून रडताना दिसत आहे. यानंतर, ती तिच्या साडीच्या पदराने त्याचा फोटो साफ करताना दिसत आहे. हा खूप भावनिक व्हिडिओ आहे. जो पाहिल्यानंतर प्रत्येकजण नक्कीच भावुक होईल आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्यावर “मिस यू सर” लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यासह अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे की, पुनीतने जगाचा निरोप घेतला असला, तरी त्याच्या जाण्याचे दु:ख चाहते सहन करू शकत नाहीत. त्याची फॅन फॉलोविंग केवळ त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर सामाजिक कार्यामुळेही आहे. तो गरीब आणि अनाथ मुलांना मदत करत असे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते शिक्षणापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबासह या लोकांनाही मोठा धक्का बसला आहे.
जर पुनीत राजकुमारच्या मनोरंजक गोष्टींबद्दल बोलायचं झालं, तर तो त्याच्या सामाजिक कार्यामुळे सर्वांचा आवडता होता. जाताना वडिलांप्रमाणेच त्याने नेत्रदान केले. त्याला ‘गरिबांचा देवदूत’ म्हटले जायचे. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. त्याने गरीब मुलांसाठी ४५ शाळा बांधल्या आहेत, जिथे मुलांना मोफत शिक्षण मिळू शकते. त्याचा खर्च पुनीतने स्वतः उचलला होता. एवढेच नाही, तर २६ अनाथाश्रम, १६ वृद्धाश्रम, १९ गोशाळा आणि १८० मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था तो स्वत: करत असे. त्याने लोकांना कधीच त्रास दिला नाही, तर त्यांचे सर्व प्रश्न सोडवले. लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत राहिला. अशा परिस्थितीत चाहत्यांनी त्याला न विसरणे, हे स्वाभाविक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ
-‘पंगा क्वीन’ कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न केले उपस्थित, म्हणाली, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकांचा…’