Wednesday, June 26, 2024

Anniversary | लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आर माधवनने पत्नीला दिल्या प्रेमळ शुभेच्छा, शेअर केला थ्रोबॅक फोटो

बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता आर माधवन (R Madhavan) आज  (७ जून) त्याच्या लग्नाचा २३वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याने पत्नी सरिता बिर्जे हिला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. आपल्या पत्नीसोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत, अभिनेत्याने एक लव्ह नोट लिहिली आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर थ्रोबॅक फोटो शेअर करत, आर माधवनने कॅप्शनमध्ये लिहिले, “हे असं कसं होत आहे की, मी आता तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करत आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नी…” (actor r madhavan share throwback photo on his 23rd marriage anniversary)

अभिनेत्याने आपल्या पत्नीला या रोमॅंटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माधवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. त्याने यात काळ्या रंगाचा सूट घातला आहे, तर पत्नी सरिता सलवार सूटमध्ये दिसत आहे. 

माधवनसोबत पत्नी सरितानेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये काही वर्षांपूर्वीची आणि आजची झलक पाहायला मिळते. हा फोटो शेअर करत सरिताने पती माधवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सरिताने लिहिले, “२३ वर्षे एकत्र. वेळ किती वेगाने जातो, हे आज कळले. मी तुला खूप प्रेम करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय.”

माधवन आणि सरिता यांचे लग्न विवाह ७ जून १९९९ रोजी झाले होते. ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माधवन सध्या त्याच्या बायोपिक चित्रपट ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १ जुलै २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा