Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड ‘रंग दे बसंती’मध्ये सोहा अली खानसोबतच्या किसींग सीनबद्दल बोलला आर माधवन; म्हणाला, ‘सैफबाबत विचार करूनच…’

‘रंग दे बसंती’मध्ये सोहा अली खानसोबतच्या किसींग सीनबद्दल बोलला आर माधवन; म्हणाला, ‘सैफबाबत विचार करूनच…’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक ओम प्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती‘ या चित्रपटाची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये केली जाते. मेहरा आजकाल ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. ज्यात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात दिग्दर्शकाने त्याच्या चित्रपटांशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यापैकी एक ‘रंग दे बसंती’शी देखील संबंधित आहे.

चित्रपटाशी संबंधित एक किस्सा आर माधवनशी संबंधित आहे. वास्तविक, ‘रंग दे बसंती’मध्ये आर माधवनने चित्रपटात लेफ्टनंट अजय राठोडची भूमिका साकारली होती. प्रकाश यांच्या या पुस्तकाद्वारे, आर माधवन ‘रंग दे बसंती’ मधील ‘तू बिन बताए’ या गाण्यात सोहा अली खानसोबत रोमँटिक सीनदरम्यान अभिनेता किती घाबरला होता? हे उघड करतो. आर माधवन या गाण्यात दाखवलेल्या किसींग सीनदरम्यान तो सतत अभिनेत्री म्हणजेच सोहा अली खानचा भाऊ सैफ अली खान बद्दल विचार करत होता.

गाण्यामध्ये माधवन सोहाला प्रपोज करतो आणि नंतर त्यांच्यामध्ये एक रोमँटिक किसींग सीन देखील दाखवला जातो. योगायोगाने, माधवनने चित्रपटासाठी शूट केलेला हा पहिला किसचा सीन होता. राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या आत्मचरित्रात, आर माधवनने चित्रपट निर्मात्यासोबत काम करतानाचे अनुभव आणि ‘रंग दे बसंती’ मधील किसींग सीन शेअर केले आहेत.

सीन आठवत आर माधवनने लिहिले की, “सैफ अली खान (सोहा अली खानचा भाऊ), ज्याच्यासोबत मी आधीच एका चित्रपटात (रेहना है तेरे दिल में) काम केले होते. तोच मी विचार करू शकतो. यात आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी झालो. जेव्हा मी सैफचा विचार केला, तेव्हा माझे तोंड कोरडे होते. मात्र, मला दाखवायचे होते की, मी एक आदर्श प्रियकर आहे. पडद्यावर हे कदाचित माझी ही पहिली किस होती.”

किसव्यतिरिक्त, त्याने हे देखील सांगितले की, या चित्रपटात त्याला प्रथम करण सिंघानियाची भूमिका देऊ करण्यात आली होती. जी नंतर तमिळ अभिनेता सिद्धार्थने साकारली होती. त्याचवेळी, लेफ्टनंट अजय राठोडसाठी निर्मात्यांची पहिली पसंती तो नसून शाहरुख खान होता.

‘रंग दे बसंती’मध्ये आमिर खान, कुणाल कपूर, शरमन जोशी, सोहा अली खान, सिद्धार्थ आणि आर माधवनसारखे स्टार्स महत्वाच्या भूमिका साकारत होते. (madhvans first experience of doing a kissing scene in rang de basanti)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘रामायण’ फेम ‘सीता’चे 33 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत मिळाली दमदार व्यक्तिरेखा

पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा