Friday, March 29, 2024

मुलगा वेदांतसाठी आर माधवनने सोडला देश, काय आहे दुबईमध्ये शिफ्ट होण्याचं कारण?

बॉलिवूड अभिनेता आर. माधवन (R Madhavan) याचा मुलगा वेदांत हा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे. माधवनचा मुलगा वेदांत याने जलतरण स्पर्धा जिंकून वडिलांचे नाव उंचावले होते. तो गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. आता २०२६च्या ऑलिम्पिकमध्ये वेदांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अभिनेत्याने अलीकडेच एका मीडिया संवादात खुलासा केला की, तो आणि त्याची पत्नी सरिता त्यांचा मुलगा वेदांतला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी दुबईला गेले आहेत. माधवनने सांगितले की, भारताकडे ऑलिम्पिक आकाराचा पूल नसल्याने, त्यांना दुबईला जावे लागले. (actor r madhavan with his wife and son moves to dubai for preparing his son for 2026 olympics)

आर माधवनने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याच्या मुलाने ऑलिम्पिकची तयारी सुरू केली आहे. तो म्हणाला, “दुबईमध्ये मोठे जलतरण तलाव खुले आहेत आणि जवळ देखील आहेत. त्यामुळे आम्ही इथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. वेदांत ऑलिम्पिकची तयारी करत असून, सरिता आणि मी त्याच्यासोबत आहोत.” अभिनेत्याने पुढे सांगितले की, मुंबईचा मोठा स्विमिंग पूल कोरोनामुळे बंद आहे. अशा परिस्थितीत त्याला आणि त्याच्या पत्नीला वेदांतच्या तयारीत कोणताही अडथळा नको होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला मदत करणे खूप महत्त्वाचे होते.

माधवनला विचारण्यात आले की, तुम्हाला वाटते का, की तुमच्या मुलाने अभिनेता व्हावे? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याने सांगितले की, “मी याबद्दल कधीच विचार केला नाही. आमच्या मुलाला जे काही करायचे आहे त्यात मी आणि माझी पत्नी सपोर्ट करू.”

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकली ७ पदकं
त्याच वेळी, वेदांत माधवन या वर्षाच्या सुरुवातीला चर्चेत आला होता. त्याने बेंगळुरू येथे होणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये एकूण सात पदके जिंकली. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्याच्या मुलाने ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता आणि सात पदके जिंकली होती. त्याने चार रौप्य पदके आणि तीन कांस्य पदके जिंकल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा