Saturday, September 30, 2023

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी

काही दिवसांपूर्वीच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सरावात लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या बॉयफ्रेंडसोबत विकी जैनसोबत लग्न बंधनात अडकली. तिच्या लग्नाच्या सर्व विधींचे आणि फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तिच्या लग्नाच्या व्हिडिओंमध्ये अंकितानेच तिचे लग्न एन्जॉय करत धमाल मस्ती केल्याचे दिसले. तिच्या लग्नाचे फोटो अंकिताच्या मैत्रमैत्रिणी देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. अंकिताचे लग्न तर धुमधडाक्यात पार पडले. मात्र लग्नानंतर अंकिताचा गृहप्रवेश कसा झाला असेल? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता अंकिताने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या गृह्प्रवेशाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी विधीवत गृहप्रवेश करत आहे. अंकिताने निळ्या रंगाची आकर्षक साडी आणि त्याच्यावर मंगळसूत्र, डायमंड नेकलेस घातला असून, तिचा लूक अतिशय साधा मात्र तितकाच आकर्षक दिसत आहे. तर विकी फॉर्मल ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे घर अंडरकन्सट्रक्शन असून, या घरत येण्याआधी अंकिताने आणि विकीने घराच्या बाहेरच्या भिंतींवर त्यांच्या हाताचे छापे मारले. त्यानंतर तिला ओवाळले गेले आणि मग तिने कलश ओलांडून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिने तिथे असणाऱ्या सर्व मोठ्या लोकांना नमस्कार करते आणि आशीर्वाद घेते. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “मिस्टर जैन आणि त्यांच्या कुटुंबासोबत नवीन सुरुवात”

अंकिताने १४ डिसेंबर रोजी मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये अलिशान पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर अंकिताचा नुकताच वाढदिवस झाला. हा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास ठरला. वाढदिवसानंतर अंकिताने तिचे आणि विकीचे काही फोटो शेअर करत सर्वांना धन्यवाद देखील म्हटले.

हेही वाचा :

सैफ अली खान आणि करीना यांचा लाडका मुलगा तैमूर झाला पाच वर्षांचा, त्याला सांभाळताना बेबोला येतो घाम

तेलंगणामधील ‘या’ समलैंगिक जोडप्याने बांधली लगीनगाठ, समाजापुढे ठेवला मोठा आदर्श

‘केस विंचरायला विसरली वाटतं!’, विमानतळावर काजोलचा विचित्र लुक नेटकऱ्यांनी विचारले तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न 

हे देखील वाचा