बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये राहुल देव याचाही समावेश होतो. राहुलचे नाव प्रतिभावान अभिनेत्यांच्या यादीत घेतले जाते. त्याने फक्त बॉलिवूडच नाही, तर साऊथ इंडस्ट्रीतही शानदार अभिनयाने सर्वांचे मने जिंकली आहेत. राहुल हा एक सिंगल वडील आहे. तो एकटाच त्याच्या मुलाचा सांभाळ करतो. राहुलने एक सिंगल वडील म्हणून आपल्या चिंता आणि इंडस्ट्रीतील पुनरागमनाबद्दल आलेल्या अडचणींबद्दल चर्चा केली आहे.
अभिनेता राहुल देव (Rahul Dev) याची पत्नी रीना देव (Reena Dev) हिचे 2009 मध्ये निधन झाले होते. नुकतेच, राहुलने सिंगल वडील म्हणून आपला वेदनादायी अनुभव शेअर केला. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, “पालकत्व नक्कीच सोपे नाहीये. मुलांचा सांभाळ करण्यात महिलांची मोठी भूमिका असते. ज्याप्रकारे ते मुलांना समजून घेतात, कदाचित यामुळे कारण त्यांनी मुलाला जन्म दिलेला असतो. मुलांसाठी एका महिलेकडे खूप धैर्य असते. मीदेखील प्रयत्न केला आणि खूप काही केले, परंतु अनेकदा असेही होते, जेव्हा मी स्वत:वरील नियंत्रण गमावून बसायचो. मला आई आणि वडील दोन्ही बनण्याचा प्रयत्न करावा लागायचा.”
‘सिंगल पालकत्व सोपे नाही’
पुढे बोलताना त्याने सांगितले की, “जेव्हा मी शाळेत पालकांच्या मीटिंगमध्ये जायचो, तेव्हा त्यावेळी अधिकतर मुलांसोबत त्यांची आई आल्याचे पाहायचो. त्यावेळी मला खूपच अस्वस्थ वाटायचे.” आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, “हे खूपच वेदनादायी आहे आणि यापैकी बरेच काही असे आहे, जे मला आठवायचे नाही. मी प्रार्थना करतो की, असे कुणासोबतच होऊ नये, जे माझ्यासोबत घडले आहे. सिनेमात हे सोपे वाटते. सिनेमात दिसते की, कुणीतरी विधवा झाले आहे आणि पुन्हा आयुष्य सुरुवात करते. मात्र, पुन्हा आयुष्य सुरू करणे खूप कठीण आहे.”
View this post on Instagram
‘बिग बॉस’मध्ये यासाठी घेतला होता भाग
अभिनेत्याने पुढे सांगितले की, “जेव्हा त्याचा मुलगा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेला होता, तेव्हा त्याने मुंबईत येऊन पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला.” ‘बिग बॉस’ या शोमध्ये भाग घेण्याबद्दलही त्याने सांगितले की, “इतके काम केल्यानंतरही मी बिग बॉस 10मध्ये भाग घेतला. कारण, माझ्याकडे कोणतेच काम नव्हते.” त्याने पुढे असेही सांगितले की, “यासाठी मी कुणालाही दोष देणार नाही. कारण, आमच्या क्षेत्रात मार्केट खूप वेगाने पुढे जात असते आणि 4 वर्षांचा काळ हा खूप मोठा काळ असतो.”
राहुल देव याच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ‘मास’, ‘चॅम्पियन’, ‘तोरबाज’, ‘इंडियन’, ‘शापित’, ‘फुटपाथ’, ‘रॉकी’, ‘येवडू’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
यामुळे रणबीरने घेतले नाही ‘ब्रम्हास्त्र’साठी मानधन, दिग्दर्शकाने केले मोठा खुलासा
‘बटण लावायला विसरलीस का…’, अभिनेत्री जान्हवी कपूरची विमानतळावर झाली चांगलीच फजिती, व्हिडिओ व्हायरल
हॉटेलमध्ये जेवायला गेला अन् प्रेमात पडला, अभिनेता बॉबी देओलची फिल्मी लवस्टोरी ऐकून व्हाल थक्क










