हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. कारण, बॉलिवूड कलाकार विकी कौशल- कॅटरिना कैफ, रणबीर कपूर- आलिया भट्ट यांच्यापाठोपाठ आता राजकुमार राव आणि पत्रलेखा ही जोडीही लवकरच लग्नबंधनात अडकण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, राजकुमार आणि पत्रलेखाचे लग्न कुठे होणार हे देखील निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे.
‘या’ शहरात लग्न करणार आहेत राजकुमार आणि पत्रलेखा
माध्यमांतील वृत्तांनुसार, रोमँटिक जोडपं राजकुमार आणि पत्रलेखा नोव्हेंबर महिन्यातच लग्न करणार आहेत. नोव्हेंबर महिन्यातील १०, ११ आणि १२ या दिवशी त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू राहील. यासोबतच त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाबाबतही वृत्त समोर येत आहे. असे म्हटले जात आहे की, राजकुमार आणि पत्रलेखा देशातील गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी जयपूरमध्ये लग्न करणार आहेत. माध्यमांतील वृत्तांमध्ये असेही म्हटले जात आहे की, राजकुमार आणि पत्रलेखा हे जयपूर किंवा राजस्थानमध्ये सात फेरे घेतील. (Actor Rajkummar Rao And Patralekha Soon To Tie The Knot In Pink City Jaipur Says Reports)
माध्यमांतील वृत्तांनुसार, राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाचे कार्ड अजूनही वाटले जात आहेत. लग्नात खूपच कमी लोकांचा सहभाग असेल. कुटुंबातील सदस्यांसोबतच खूपच खास मित्रमंडळी या लग्नात सामील होतील. तसेच, ते खूपच पारंपारिक पद्धतीने सात फेरे घेणार आहेत.
राजकुमार आणि पत्रेलखा यांनी एकत्र चित्रपटातही काम केले आहे. त्यांनी ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटात काम केले होते. एका मुलाखतीत राजकुमारने म्हटले होते की, “पत्रलेखाला वाटले की, मी चित्रपटातील पात्रासारखाच खऱ्या आयुष्यातही आहे.” अशामध्ये पत्रलेखा त्याच्यापासून दूर राहत होती आणि बोलतही नव्हती. मात्र, जेव्हा दोघांनीही बोलायला सुरुवात केली, तेव्हा ते एकमेकांच्या जवळ आले.
राजकुमार आणि पत्रलेखा हे जोडपे जवळपास १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांनी मोकळेपणाने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. यासोबतच राजकुमारने म्हटले की, पत्रलेखाला भेटण्यापूर्वी त्याने तिची एक जाहिरात पाहिली होती. राजकुमारने विचार केला की, ही किती गोड मुलगी आहे. हिच्याशी लग्न केले पाहिजे.
राजकुमार आणि पत्रलेखा हे दोघेही खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावरही दोघे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. राजकुमार राव आणि पत्रलेखाचे चाहते खूप वर्षांपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अशात त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमीच आहे की, त्यांचे आवडते जोडपे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल
-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम