Friday, December 8, 2023

जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे त्याच्या कथेमुळे नव्हे, तर त्याच्यातील गाण्यांमुळे हिट झाले आहेत. यावरून आपण समजू शकतो की, चित्रपटांमध्ये गाण्याला किती अनन्यसाधारण महत्व आहे. असे अनेक गायक आहेत, ज्यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मात्र 90च्या दशकात एक असा आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडला, ज्याने त्यांना त्यांचे पाय थिरकवायला भाग पाडले. हा आवाज होता गायिका उषा उत्थुप यांचा.

बॉलिवूडची पॉप क्वीन उषा उत्थुप यांचा बुधवारी (8 नोव्हेंबर) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1947 रोजी मुंबईत झाला. एक वेळ अशी होती, जेव्हा उषा उत्थुप यांना त्यांच्या जड आवाजामुळे वर्गाबाहेर काढले जायचे, मात्र नंतर त्याच जड आवाजाने उषाजींना ओळख दिली. सोमवारी, 8 नोव्हेंबर रोजी उषा आपल्या आयुष्याची 74 वर्षे पूर्ण करत आहेत. या 74 वर्षात त्यांच्या आयुष्यात काय चढउतार आले आणि त्या या यशाच्या शिखरावर कशा पोहचल्या, चला जाणून घेऊया… 9happy birthday usha uthup here are some interesting and funny facts about her you must know)

हॉटेल्समध्ये गाऊन केली कारकिर्दीला सुरुवात
उषा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात हॉटेलमध्ये गाणे गाऊन केली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईतील टॉक ऑफ द टाऊन आणि कोलकाता येथील ट्रिनकस सारख्या नाइटक्लबमध्ये गायक म्हणून ओळख मिळवली.

आवाजाने प्रभावित झाले शशी कपूर
उषा यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी झाली. दिल्लीतील एका पार्टीत गाणे गात असताना शशी कपूर यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांच्या आवाजाने प्रभावित होऊन शशी कपूर यांनी त्यांना चित्रपटात गाणी गाण्याची ऑफर दिली. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या गाण्याने उषा यांनी चित्रपटात पदार्पण केले. यानंतर त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत ‘दम मारो दम’ हे प्रसिद्ध गाणे गायले. या गाण्याच्या इंग्रजी ओळी उषा यांनी गायल्या आणि तेव्हापासून बॉलिवूडने त्यांना नोटीस केले जाऊ लागले.

कांजीवरम साडी आणि मोठ्या टिकलीचा छंद
उषा उत्थुप यांना कांजीवरम साडी आणि कपाळावर मोठी गोल टिकली लावायला खूप आवडते. त्यांनी अनेक वर्षे हा ट्रेंड कायम ठेवला होता. बॉलिवूडमध्ये आपले स्थान प्राप्त केल्यानंतर, त्यांनी आपल्या लूकमध्ये काही बदल केले. परंतु आपली जुनी स्टाईल कधीच सोडली नाही.

उषा उत्थुप सांगतात की, त्यांना लाइव्ह परफॉर्मन्स जास्त आवडतो. मुंबईत जन्मलेल्या उषा उत्थुप या तमिळ ब्राह्मण कुटुंबातील आहेत. वजनदार आवाजामुळे उषाला अनेकदा संधी मिळाली नाही, पण त्यांनी कधीच हार मानली नाही आणि आज त्या अशा टप्प्यावर पोहोचल्या आहेत, जिथे त्यांना परिचयाची गरज नाही.

आरडी बर्मन आणि बप्पी लाहिरी यांच्यासोबत उषा यांची चांगलीच जोडी जमली होती. त्यांनी त्यांची बहुतेक गाणी यांच्यासोबत गायली आहेत. याशिवाय विशाल भारद्वाजच्या ‘सात खून माफ’ या चित्रपटातील, रेखा भारद्वाजसोबत गायलेल्या ‘डार्लिंग’ या गाण्यानेही धमाल केली होती. विशेष म्हणजे, उषा यांनी जगातील प्रत्येक मोठ्या शहरात आपला परफॉर्मन्स दिला आहे.

हेही वाचा-
जान्हवी कपूरच्या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर जलवा, एकदा पहाच
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली

हे देखील वाचा