Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा भारीच ना! पुन्हा सुरू होणार कियारा अन् रामच्या १७० कोटी रुपये बजेट असलेल्या ‘या’ सिनेमाची शूटिंग

भारीच ना! पुन्हा सुरू होणार कियारा अन् रामच्या १७० कोटी रुपये बजेट असलेल्या ‘या’ सिनेमाची शूटिंग

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अतिशय हँडसम आणि सुपरस्टार असलेला अभिनेता म्हणजे राम चरण होय. हा अभिनेता वडिलांच्या म्हणजेच चिरंजीवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो या क्षेत्रात आला आहे. त्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या जोरदार अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. राम चरण आता बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे तात्पुरते शीर्षक ‘आरसी१५’ आहे. शंकर षणमुगम दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. नमूद केल्याप्रमाणे ‘आरसी१५’च्या निर्मात्यांनी एक शूट शेड्यूल केले आहे. जे आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात केले जाईल.

या शेड्युलमध्ये काही महत्त्वाची सीन दिसणार आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, १७० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या सिनेमाची शूटिंग ६ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. निर्माता दिल राजू यांनी सांगितले केले आहे की ‘आरसी१५’ पोंगल २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग पूर्ण व्हावे यासाठी निर्मात्यांना वेगाने शूटिंग सुरू करावे लागेल.

बहुप्रतिक्षित या चित्रपटाची घोषणा जवळपास वर्षभरापूर्वी झाली होती. या चित्रपटात राम चरण (Ram Charan) आणि कियारा आडवाणी, सुनील, अंजली, नवीन चंद्र, जयराम आणि इतर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अलीकडेच रामने आपले मानधन ‘मेगा पॉवर’च्या पातळीवर वाढवले ​​आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकप्रियता लक्षात घेऊन अभिनेत्याने आपली फी वाढवली असून, आगामी चित्रपटांसाठी त्याने १०० कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही पाहा- ‘बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

राम चरणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा ‘मगधीरा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने उपासनाला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर या दोघांनी २०११ मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर पुढे त्यांनी २०१२ मध्ये अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एकमेकांशी लग्नगाठ बांधली. राम चरण आणि उपासना यांच्या लग्नाला आता ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही त्यांच्यात प्रचंड प्रेम आहे. चाहत्यांमध्ये देखील ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा