×

‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकले राम चरण-कीर्ती सुरेश; व्हिडिओ पाहून तुम्हीही धराल ठेका

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि कीर्ती सुरेश यांचा आगामी चित्रपट ‘गुड लक सखी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. बुधवारी (२६ जानेवारी) हैदराबादमध्ये ‘गुड लक सखी’च्या प्री-रिलीझ इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. दोघांनी एकत्र स्टेजही शेअर केला आणि यावेळी त्यांनी आगामी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या प्रसिद्ध गाण्याचे हुक स्टेप केले आणि यादरम्यान त्यांच्या स्टेप्सला चांगलीच पसंती मिळाली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

कीर्तीने (Keerthy Suresh) ‘गुड लक सखी’ (Good Luck Sakhi) या चित्रपटामध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. ही तिची आतापर्यंतची सर्वात वेगळी भूमिका आहे. या कार्यक्रमात चित्रपटाची एक झलकही पाहायला मिळाली. यासोबतच अभिनेता राम (Ram Charan) प्रमुख पाहुणा म्हणून कार्यक्रमाला पोहोचला होता. यादरम्यान कीर्तीच्या विनंतीनंतर रामने ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याची हुक स्टेप केली आहे. यावेळी अभिनेता काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या पायजमामध्ये दिसला. त्याचवेळी, अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात खूपच सुंदर दिसली.

चिरंजीवी आले कोरोना पॉझिटिव्ह
कार्यक्रमात राम चरणने चिरंजीवी यांच्याबद्दल सांगितले की, “त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवायचे होते आणि संपूर्ण टीमला प्रोत्साहन द्यायचे होते. पण, ते त्यात सामील होऊ शकले नाही हे दुर्दैव आहे.” आदल्या दिवशी चिरंजीवी यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून चाहत्यांना कळवले होते की, त्यांचा कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajesh Kumar Reddy (@rajeshreddyega)

कीर्तीचा चित्रपट २८ जानेवारीला होणार आहे प्रदर्शित
कीर्ती सुरेशच्या ‘गुड लक सखी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटाचा ट्रेलर व्हिडिओ सोमवारीच प्रदर्शित झाला आहे. हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. नागेश कुकुनूर हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. महिलांवर आधारित हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. २८ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ही अभिनेत्री आतापर्यंतची सर्वात वेगळी व्यक्तिरेखा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तिच्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

हेही वाचा-

Latest Post