Friday, May 9, 2025
Home बॉलीवूड ‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ

‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ

दक्षिणेचा सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट आरआरआर च्या ‘नाटू – नाटू‘ या गाण्याला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गच्या कॅटगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला.अलीकडेच अभिनेता आपल्या पत्नीसह अमेरिकेतून भारतात परतला. यावेळी विमानतळावर अभिनेत्याचे जंगी स्वागत करण्यात आले. अशात आता अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट ‘RC 15’ च्या शूटिंगसाठी सेटवर परतला आहे जिथे त्याला त्याच्या संपूर्ण टीम आणि स्टाफकडून एक आश्चर्यकारक सरप्राइज मिळाले.

खरं तर, कोरिओग्राफर-दिग्दर्शक प्रभुदेवाने चित्रपटाच्या टीमसह नाटू-नाटू या गाण्यावर नृत्य करून अभिनेत्याचे खास स्वागत केले. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वतः राम चरणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

अभिनेत्याने शेअर केलेल्या या क्लिपमध्ये प्रभूदेवा आणि सेटवरील बाकीचे लोक नाटू-नाटूची हुक स्टेप करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पुढे, प्रभुदेवा राम चरण याचे शूटिंग सेटवर फुलांचा हार घालून स्वागत करताना देखील दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

या पोस्टसह अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अशा स्वागताबद्दल मी तुमचे कितीही आभार मानले तरी कमी आहे.” या सुंदर सरप्राइजबद्दल धन्यवाद प्रभुदेवा सर. शूटवर परत आल्याने खूप छान वाटले.”

अशात आता या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ऐतिहासिक.”, तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात.” अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ग्लोबल स्टार राम चरणचे भव्य स्वागत झाले.” याशिवाय अनेक युजर्स या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी देखील शेअर करत आहेत.(actor ram charan grand welcome from prabhudeva on set of rc15 see video here )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
मलायकाचे अर्जुन कपूरसाेबत अफेअर असतानाही अरबाज का भेटताे अभिनेत्रीला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
चित्रपटांपासून दूर असलेल्या श्वेताने सांगितला बालपणीचा ‘ताे’ किस्सा; म्हणाली, ‘मेकअप रूममध्ये…’

हे देखील वाचा