Tuesday, March 5, 2024

‘RRR’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

‘आरआरआर’च्या यशानंतर अभिनेता राम चरण जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे तो लोकप्रिय झाला आहे. रामचरण लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार असे मिडिया रिपोर्अटनुसार समजले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, तो हॉलीवूडच्या प्रकल्पाबाबत त्याचे बोलणे झाले आहे.

वृत्तानुसार, टॉलीवूड अभिनेत्याने असेही सांगितले आहे की, काही महिन्यांत त्याच्या हॉलीवूड प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली जाईल. याशिवाय त्याला ज्युलिया रॉबर्ट्स, टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांसारख्या हॉलीवूडच्या दिग्गजांसह काम करायचे आहे. या चर्चेने त्याचे चाहते नक्कीच आनंदी झाले आहे. जे आता ‘RRR’ स्टारला जागतिक स्टारच्या रुपात पाहण्याची वाट बघत आहे.

डेव्हिड पोलंडने आयोजित केलेल्या दीर्घकाळ चाललेल्या DP/30 या सीरीजमध्ये रामचरण दिसला तेव्हा हे समोर आले. इथे तो म्हणाला, ‘हॉलीवूडचा अभिनेता व्हायला कोणाला आवडत नाही? जग एकत्र येत आहे, ते एक होत आहे आणि मला वाटतं की सिनेमाही ‘ग्लोबल सिनेमा’ म्हणून ओळखला जाणार आहे. हे आता हॉलीवूड किंवा बॉलिवूड नाही. संस्कृतीची देवाणघेवाण, प्रतिभेची देवाणघेवाण सुरू झाली. सर्व दिग्दर्शकांनी आम्हाला अभिनेते म्हणून अनुभवावे अशी माझी इच्छा आहे आणि मलाही तेच करायला आवडेल. ही एक चांगली बाब असेल.’

दरम्यान, राम चरण सध्या अमेरिकेत होणाऱ्या ऑस्कर 2023 साठी त्याच्या ‘RRR’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्कर 2023 साठी नामांकन मिळाले आहे. गुड मॉर्निंग अमेरिका आणि क्लटा एंटरटेनमेंट या दोन लोकप्रिय हॉलिवूड टॉक शोमध्ये अभिनेता अलीकडेच त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. याशिवाय ‘आरआरआर’च्या निर्मात्यांनी एक खास स्क्रीनिंगही आयोजित केले होते. (south actor ramcharan after rrr movie success debut in hollywood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी ‘ म्हणत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसाठी तुरुंगातून लिहिले अजून एक प्रेमपत्र
‘ये काली काली आँखें…’ दीपिकाचा लेटेस्ट फाेटाेशूट पाहिलात का?

हे देखील वाचा