मुंबईत राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी अलिबाग हे आवडते आणि जवळचे ठिकाण वाटते. अलिबागला मुंबईकरांच्या नजरेत एक वेगळेच महत्व आहे. विशेषत: गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीच्या काळात हे ठिकाण सर्वच लोकांच्या जवळचे झाले आहे. जिथे ते सहजपणे भेट देऊ शकतात आणि त्यांची छोटी सुट्टी अगदी आनंदाने आणि आरामात एन्जॉय करू शकतात. अलिकडेच, टीव्ही अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) आणि त्याची पत्नी गौतमी कपूर (Gautami Kapoor) यांनी अलिबागमध्ये एक आलिशान हॉलिडे होम विकत घेतले आहे.
राम म्हणाले की, “माझ्याकडे गोव्यात हॉलिडे होम्स आहेत, त्यामुळे दुसरे घर घेण्याचे कारण नव्हते. पण २०१७ पासून मी मुंबईत माझ्या घराला लागून असलेली मालमत्ता शोधत होतो आणि आता ही मालमत्ता अलिबागमध्ये असल्याचे मला समजले. मला अलिबागमध्ये घर घेण्याची कल्पना छान वाटली. खूप दूर नसलेली जागा शोधायची आणि माझ्या कुटुंबासोबत वीकेंडला तिथे जाऊन मी तेथे आराम करू शकेन अशी योजना होती.”
“गोवा आणि खंडाळा ही उत्तम ठिकाणे आहेत पण ती घराच्या जवळ नाहीत. माझे नातवंडे देखील त्यांच्या सुट्ट्यांच्या आनंद घेऊ शकतील असे घर घेण्याचे माझे स्वप्न होते. गेल्या दोन वर्षांत अलिबागचा खूप विकास झाला आहे, येथे तुम्हाला उत्तम खाण्याची ठिकाणे, चांगली सेवा आणि अनेक सुविधा मिळतील. अखेर मुंबईजवळ माझे स्वतःचे दुसरे घर असण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे,” असेही ते पुढे म्हणाले आहेत.
ही मालमत्ता विकत घेण्यापूर्वी राम कपूर यांनी मालदीवमध्ये सुट्टीसाठी बुकिंग केले होते. त्यामुळे ते आपले नवीन वर्ष संपूर्ण कुटुंबासह तेथे घालवतील. मात्र, राम कपूर यांची पत्नी आणि मुले वीकेंड अलिबागमध्ये घालवण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे, राम कपूर यांचा दर गुरुवारी संध्याकाळी तिथे जाण्याचा आणि रविवारी परत येण्याचा प्लॅन आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित
-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला










