Thursday, December 5, 2024
Home साऊथ सिनेमा ‘लोकं आमच्या इंडस्ट्रीची चेष्टा करायचे’, साऊथ सिनेमांविषयी ‘भल्लाळदेव’ स्पष्टच बोलला

‘लोकं आमच्या इंडस्ट्रीची चेष्टा करायचे’, साऊथ सिनेमांविषयी ‘भल्लाळदेव’ स्पष्टच बोलला

बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारे अनेक कलाकार आहेत. या कलाकारांमध्ये साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबती याचाही समावेश होतो. ‘बाहुबली‘मध्ये ‘भल्लाळदेव‘ साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता राणा डग्गुबती त्याच्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तो जेव्हाही अशी विधानं करतो, तेव्हा त्याची सर्वदूर चर्चा रंगू लागते. असेच काहीसे आताही झाले आहे. राणा डग्गुबती याचे साऊथ सिनेमांविषयी वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधत आहे.

साऊथ सिनेमांवर राणा डग्गुबतीचे वक्तव्य
अभिनेता राणा डग्गुबती (Rana Daggubati) हा ज्याप्रकारे रुपेरी पडद्यावर बिनधास्त दिसतो, अगदी तसाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही आहे. तो अनेकदा त्याची मतं मोकळेपणाने मांडताना दिसला आहे. अशात त्याने सध्या सिनेसृष्टीत साऊथ सिनेमांच्या यशाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्याने असेही सांगितले की, काही वर्षांपूर्वी लोक कशाप्रकारे साऊथ सिनेमांविषयी मतं मांडायचे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राणा डग्गुबती म्हणाला की, “सध्याच्या काळात आमचे सिनेमे शानदार प्रदर्शन करत आहेत. मात्र, पाच वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, लोक साऊत सिनेमांची खिल्ली उडवत होते. लोक म्हणायचे की, हे साऊथ सिनेमे आहेत, हे कोण पाहतात? अशात तुम्ही आणि आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहोत की, कशाप्रकारे साऊथ सिनेमे काम करत आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राणा डग्गुबतीचे प्रोजेक्ट्स
राणा डग्गुबती लवकरच वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल टाकणार आहे. खरं तर, तो ‘राणा नायडू’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. त्याच्या या वेब सीरिजसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन महिन्यांपूर्वी राणाच्या या क्राईम थ्रिलर वेब सीरिजचा टीझरही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. मात्र, या वेब सीरिजची तारीख अद्याप घोषित झाली नाहीये. (Actor rana daggubati said people used to joke about south films)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
चेतन भगत राहिले बाजूला आता ‘या’ अभिनेत्रीने घेतला उर्फीशी पंगा; म्हणाली, ‘चिखलात दगड मारल्यावर…’
असं काय झालं की, ‘बिग बॉस 14’ विनर रुबीनाला द्यावे लागले प्रेग्नंसीवर स्पष्टीकरण; घ्या जाणून

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा