जिममध्ये घाम गाळताना दिसतोय बाहुबलीमधील ‘भल्लाळदेव’, व्हिडिओ पाहून सगळेच हैराण

South Superstar Rana Daggubati Gym Workout Latest Video Goes Viral On Social Media


दाक्षिणात्य चित्रपटातील चमकता सितारा म्हणजे ‘राणा डग्गुबती’. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. परंतु बाहुबली या सिनेमानंतर तो नावारूपाला आला. तिथूनच त्याच्या करिअरला खरी सुरुवात झाली. बाहुबली या चित्रपटात त्याला प्रेक्षकांकडून खूप कौतुक आणि प्रेम मिळाले. ‘भल्लाळदेव’ हे पात्र निभावून राणाने प्रत्येकाच्या मनात जागा बनवली. ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहित असेल की, राणा हा एक फिटनेस प्रेमी आहे. एवढंच काय पण फिटनेसच्या बाबतीत त्याने अनेक कलाकारांना मागे टाकले आहे. यातच राणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्या व्हिडिओला खूपच प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांनाही तो मोठ्या प्रमाणत आवडत आहे.

राणा डग्गुबती याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो व्यायाम करत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याचे मसल्स आणि बायसेप्स दाखवत आहे.

राणाने या व्हिडिओसोबत एक कॅप्शन देखील लिहिलं आहे. त्यात त्याने असं लिहिलं आहे की, “बिल्डिंग बॅक बेसिक.” म्हणजेच तो त्याच्या बॉडीला पुन्हा पहिल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओला‌ त्याच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तसेच कमेंट वर कमेंट त्याच्या या व्हिडिओला मिळत आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

राणाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो त्याच्या येणाऱ्या चित्रपटात पावर स्टार ‘पवन कल्याण’ याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा एक मल्याळम ‘आयप्पनम कोशियुग’ या तेलुगु चित्रपटाचा रिमेक असणार आहे. ‘सागर के चंद्रा’ या चित्रपटाचे निर्माते आहेत.

याव्यतिरिक्त राणा डग्गुबती आगामी काळात येणाऱ्या ‘विराट पर्वंम’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘साई पल्लवी’ ही त्याची को-स्टार असणार आहे. हा चित्रपट 20 एप्रिलला सिनेमागृहातून सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. ‘वेणू उदुगुला’ हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत. तसेच नवीन चंद्र, जरिना वहाब, अस्वारी राव, आणि साई चांद हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राणा डग्गुबती, प्रिया मनी आणि नंदिता दास हे या चित्रपटात नक्षलवाद्यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात साई पल्लवी ही एक प्रसिद्ध गायिका असते. परंतु नंतर ती देखील नक्षलवाद्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.