Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड काय सांगता! आलियाच्या पाठीमागे रणबीरने ‘या’ अभिनेत्रीसाेबत केला राेमान्स

काय सांगता! आलियाच्या पाठीमागे रणबीरने ‘या’ अभिनेत्रीसाेबत केला राेमान्स

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रणबीर कपूर चर्चेत आहे. तो आणि आलिया लवकरच आई – बाबा होणार आहे. रणबीर कपूर अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र‘ या चित्रपटात दिसला होता. त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आलिया भट्टसोबत नाही तर अनन्या पांडेसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

रणबीर कपूर आणि अनन्या पांडे यांनी अलीकडेच एथनिक कपड्यांच्या ब्रँडसाठी एक नवीन जाहिरात शूट केली आहे, ज्यामध्ये ते एकमेकांबद्दल विचार करत आहेत की, ते एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. मग असे असताना ते एक जोडपे कसे हाेणार ? त्याचप्रकारे ते व्हिडीओमध्ये एकमेकांशी डोळ्यातल्या डाेळ्यात संवाद साधत आहेत. या व्हिडिओला ब्रँडने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शेअर केले आहे, जिथे चाहते कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

या चित्रपटांमध्ये दिसणार रणबीर कपूर 
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायतचे झाले, तर रणबीर लवकरच लव रंजन दिग्दर्शित ‘अनटाइटल्ड रोमँटिक ड्रामा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याव्यतिरिक्त अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. याशिवाय रणबीर संदीप रेड्डी वांग दिग्दर्शित ‘एनिमल’ या चित्रपटात नॅशनल क्रश रश्मिका मंदान्नासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसणार
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अनन्या लवकरच सिद्धांत चतुर्वेदी आणि गौरव आदर्श यांच्यासोबत ‘खो गये हम कहाँ’ मध्ये दिसणार आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत पूर्णपणे हरवलेल्या मुंबईत राहणाऱ्या तीन तरुणांभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्जुन वरेन सिंग यांनी केले आहे. याशिवाय अनन्या पांडे आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिचा हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
साेनमचा मुलाला स्तनपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या चाहते का करत आहेत काैतुक

अभिनेत्री श्रिया सरनने सगळ्यांसमाेर रशियन खेळाडूला केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा