Thursday, June 13, 2024

‘या’ दिग्दर्शकाच्या अत्याचाराला कंटाळून रणबीर कपूरने सोडला ‘हा’ चित्रपट, खुलासा करत मांडली व्यथा

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा मुलगा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा आज चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीरने ‘सावरिया’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. या चित्रपटात रणबीरसोबत अनिल कपूरची (Anil Kapoor) लाडकी मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) होती आणि हा तिचाही पदार्पण चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी केले होते. भन्साळींसोबत काम करणं हे प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीचं स्वप्न असायचं, पण भन्साळींसोबत काम करणं अजिबात सोपं नसल्याचं रणबीरचं मत आहे.

खरं तर, ‘सावरिया’पूर्वी रणबीरने भन्साळींना ‘ब्लॅक’मध्ये असिस्ट केले होते. त्याबद्दल बोलताना रणबीर म्हणाला होता की, “भन्साळी कामाच्या बाबतीत खूप कडक आहेत. काही काळानंतर मला याचा त्रास होऊ लागला.” 2016 मध्ये नेहा धुपियाच्या (Neha Dhupia) पॉडकास्ट शोचा भाग बनलेल्या रणबीरने सांगितले होते, “भंसाली कामाच्या बाबतीत खूप कडक आहेत. ते सर्वात कुशल दिग्दर्शकांपैकी एक आहे. ते मला मारायचाचेही. काही काळानंतर मला खूप जड वाटू लागलं, माझा इतका छळ व्हायचा की, एका क्षणी मला चित्रपट सोडावा लागला.” (when ranbir kapoor revealed about sanjay leela bhansali torture)

पुढे तो म्हणाला, “काम करत मला 10 ते 11 महिने झाले होते आणि मला समजले की, मी हे करू शकत नाही. हे माझ्यावर हावी होत आहे. मला असे वाटते की, मी खूप भावनिक आणि संवेदनशील आहे आणि त्यांनी मला खूप चांगले ओळखले होते. त्याचमुळे सतत ते मला पोक करायचे. त्यांनी माझ्यासोबत जरा जास्त केले होते.”


हेही वाचा –
‘मुख्यमंत्र्यांच्या पत्नी माझ्या मोठ्या फॅन…’, सुकन्या मोनेंनी पोस्ट शेअर करत सांगितला ‘तो’ किस्सा
काय सांगता! महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला’ हा सिनेमा आहे ‘या’ हॉलिवूडपटाचा रिमेक

हे देखील वाचा