Monday, July 1, 2024

रणबीरला ‘यशराज फिल्म्स’कडून वाढदिवसाची अनोखी भेट, ‘शमशेरा’मधील लूक प्रदर्शित

वाढदिवस हा लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच खूप खास दिवस असतो. संपूर्ण दिवस फक्त कौतुकाचा वर्षाव, कोडकौतुक आणि मुख्य म्हणजे सर्वांकडून मिळणाऱ्या भेटवस्तू. सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटींसाठी देखील त्यांचा वाढदिवस खूप खास असतो. नक्कीच त्यांना मिळणाऱ्या भेटवस्तू ह्या खूपच महागड्या आणि मोठ्या असतात, मात्र वाढदिवसाच्या दिवशी मिळालेली भेट सर्वांसाठीच खूप अविस्मरणीय असते. आज बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता रणबीर कपूर त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

आजच्या दिवशी त्याला अनेक भेटवस्तू मिळाल्या असतील मात्र त्याच्यासाठी यशराज फिल्म्सकडून मिळालेली भेट नक्कीच आगळी आणि मोठी ठरली आहे. आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत यशराजने रणबीरच्या आगामी ‘शमशेरा’ सिनेमातील रणबीर कपूरच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. करण मल्होत्रा ​दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

या सिनेमातील रणबीरचा लूक सर्वांनाच खूप आवडला आहे. या लूकचे आणि पोस्टरचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. हे पोस्टर पाहिले खूपच शानदार आहे. त्यावर रणवीरचा लूक देखील खूप आकर्षक असून, या लूकमध्ये आपण पाहू शकतो की, त्याच्या कपाळावर एक खून, लांब आणि विस्कटलेले केस, भेदक नजर पाहून सर्वांचीच या सिनेमाबद्दल असलेली उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अद्याप त्याच्या लूकचे पूर्ण पोस्टर प्रदर्शित व्हायचे असले तरी, हेच पोस्टर सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. या पोस्टरवर ‘A Legend Will Rise’ ही ओळ देखील दिसत आहे. जी सिनेमाची टॅगलाईन असणार आहे.

या सिनेमात रणबीर कपूरसोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वाणी आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ‘शमशेराबद्दल अजून जास्त माहित समोर आली नसली तरी, हा सिनेमा एक पिरियड ऍक्शन ड्रामा असणार असून, या सिनेमात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. मागच्यावर्षी कोरोनामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले. जर कोरोना महामारी आली नसती तर आतापर्यंत हा सिनेमा प्रदर्शित झाला असता.

आज रणबीरच्या वाढदिवसाच्या दिवशी आलिया भट्टने त्याला शुभेच्छा देताना त्याच्याबद्दल असणारे प्रेम देखील व्यक्त केले.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा