Saturday, July 6, 2024

अरे हे काय! आलियाला सोडून ‘या’ अभिनेत्रीपुढे गुडघे टेकताना दिसला रणबीर, पाहा Viral Video

दिग्दर्शक लव्ह रंजन नवीन सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं नाव अद्याप ठरलेले नाहीये. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहेत. सध्या स्पेनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, हा सिनेमा रोमँटिक- कॉमेडी आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच रणबीर आणि श्रद्धाची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन लीक झाले आहेत. अशातच यातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये रणबीर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करताना दिसत आहे. यावरून आता नेटकरी प्रश्न विचारत आहेत.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या एका फॅन पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडिओत दिसते की, रणबीर आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आपल्या आगामी सिनेमातील एका गाण्याची शूटिंग करत आहेत. गाण्याच्या व्हिडिओत रणबीर श्रद्धाच्या मागे धावताना दिसत आहे. तो श्रद्धाच्या समोर आपले गुडघ्यांवरही बसताना दिसत आहे. व्हिडिओत श्रद्धा खूपच सुंदर दिसत आहे, सोबतच रणबीर आणि श्रद्धाची जोडीही चाहत्यांना आवडत आहे.

युजर्सने आलिया भट्ट हिला केले टॅग
व्हिडिओ पाहून असे दिसते की, शूटिंग कोणत्या तरी सार्वजनिक स्थळावर होत आहे. ही शूटिंग पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. त्याच गर्दीतील कुणीतरी शूटिंगचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे पाहून चाहते रणबीरची पत्नी आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आलियाला टॅग केले, तर काहींनी आलिया टॅग करत ‘सॉरी’ देखील लिहिले. तसेच, काही युजर्सने लिहिले की, “मला या व्हिडिओवर आलिया भट्टचे रिऍक्शन पाहायचे आहे.” अशाप्रकारे काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ हटवण्याचीही विनंती केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर गाण्यातील अरिजित सिंग याचा आवाजही ओळखला आहे.

रणबीरही ‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजसाठी सज्ज
रणबीर आणि श्रद्धा कपूरच्या या प्रोजेक्टमध्ये बोनी कपूर आणि डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो. एकीकडे रणबीर कपूर स्पेनमध्ये त्याचे शूटिंग पूर्ण करत आहे, तर दुसरीकडे तो त्याच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. हा सिनेमा यावर्षी ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा