Friday, July 5, 2024

‘तू काका बनलास, तू मामा बनलास’, बाप बनण्याच्या आनंदात रणबीरने जोडले पॅपराजींशी नाते

बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तो ‘शमशेरा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त रणबीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तो लवकरच वडील बनणार आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिने जेव्हापासून प्रेग्नंसीची घोषणा केली आहे, तेव्हापासून प्रत्येकजण या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. अशाच शुभेच्छांचा वर्षाव रणबीर जिथे जाईल, तिथे होत आहे. तो नुकताच एका ठिकाणी प्रमोशनसाठी गेला होता. त्यावेळी पॅपराजींनी त्याला शुभेच्छा दिल्या. यावर रणबीरनेही त्यांना मजेशीर उत्तर दिले, जे आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने मागील महिन्यात २७ जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रुग्णालयात असल्याचे दिसत होती आणि तिच्यासोबत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) होता. आलियाच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी जोरदार कमेंट्सचा वर्षाव केला होता. आता रणबीरचा पॅपराजींशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रणबीरचे मजेशीर उत्तर
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पॅपराजी रणबीर कपूर याला शुभेच्छा (Paparazzi Congrats Ranbir Kapoor) देत आहेत. पॅपराजी त्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर जमा झाले होते. जेव्हा तो रणबीर कपूरला शुभेच्छा देत होते, तेव्हा त्यांना उत्तर देताना रणबीर म्हणाला की, “तू काका बनला आहे आणि तू मामा बनला आहेस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

रणवीर सिंग यालाही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दुसरीकडे, रणबीरने रणवीर सिंग (Ranveer Singh) याला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या. रणवीर याने बुधवारी (दि. ०६ जुलै) त्याचा ३७वा वाढदिवस साजरा केला. यावर रणबीरने त्याला “वाढदिवसाच्या शुभेच्छा सुपर गाय, लव्ह यू.” असे म्हटले आहे.

रणबीर कपूरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच आलिया भट्ट हिच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात झळकणार आहे. दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसत आहेत. दुसरीकडे, ‘शेरशाह’ सिनेमात त्याच्याव्यतिरिक्त वाणी कपूर आणि संजय दत्त या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. हा सिनेमा २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मनात होती नेहासारखी कोणी, नशीबी आली…’, समीरचा शेफालीसाठी भन्नाट उखाणा

साऊथच्या अभिनेत्याकडून घृणास्पद कृत्य, लहान मुलींसमोरच झाला उघडा; पोलिसांकडून अटक

शॉकिंग! सलमान राहिला बाजूला, आता त्याच्या वकिलाच्या जीवावर उठलीय ‘ही’ टोळी; म्हणाली, ‘तुझाही गेम होणार’

हे देखील वाचा