Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड रणदीप हुड्डा बनणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

रणदीप हुड्डा बनणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

सध्या चित्रपट जगतात विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या तसेच ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. देशभर सध्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपट जोरजार गाजत आहे. या चित्रपटाची कथा १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे. त्याचप्रमाणे सध्या मराठी चित्रपट जगतातही अनेक नाविण्यपूर्ण विषयांवर चित्रपट बनवण्याची स्पर्धा लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत, ज्याचा खुलासा त्यांनी नुकताच केला आहे.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आगामी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बायोपिकमध्ये स्वातंत्र्यसैनिक वीर दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जून २०२२ पासून सुरू होणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान-निकोबारमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर करणार असून संदीप सिंग निर्मित करणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे विविध पैलू चित्रपटात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटाची आता प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

हे पात्र साकारण्यासाठी रणदीप हुड्डा खूप उत्सुक आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “असे अनेक वीर आहेत, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, सर्वांना समान महत्त्व दिले गेले नाही. विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल सर्वाधिक गैरसमज झाला आहे. अशा वीरांची कथा सांगायलाच हवी. निर्माता संदीप सिंगसोबत रणदीपची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये आलेल्या ‘सरबजीत’ या बायोपिकमध्ये काम केले होते. रणदीपने सांगितले की, “वीर सावरकर हे पात्र त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे.”

चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर गेल्या एक वर्षाहून अधिक काळ या चित्रपटावर काम करत आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “लोकांनी दुर्लक्षित केलेल्या कथा सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला इतिहास पाहण्याची संधी देतील. मला संदीपसोबत काम करायचे होते आणि आम्ही एकत्र काम करतो याचा मला आनंद आहे. संदीपने रणदीपचेही कौतुक केले आणि असे वादग्रस्त ऐतिहासिक पात्र साकारणारे भारतात मोजकेच कलाकार आहेत” असे सांगितले. या सगळ्या माहितीवरुन या आगामी चित्रपटात अनेक विषयांवर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे दिसत आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा