Wednesday, February 21, 2024

बर्थडे गर्ल Kangana चे किस्से | आजही कंगना आणि जावेद अख्तर यांच्यात सुरूये कोर्टात केस, जाणून घ्या प्रकरण

बॉलिवूडमध्ये ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले मत निर्दोषपणे व्यक्त करते. याच स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. या सगळ्याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. कंगना लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या सोबतच्या वादामुळेही चर्चेत राहिली आहे. कंगनावर जावेद अख्तर यांनी मानहानीची तक्रार केली होती. कंगना रणौत गुरुवारी (23 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि जावेद अख्तर यांच्या वादाबद्दल जाणून घेऊया.

हे प्रकरण 2020 चे आहे, जेव्हा लेखक जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक निधनानंतर, कंगनाने प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांना एका मुलाखतीत बॉलिवूडच्या ‘सुसाइड गँग’शी संबंधित असल्याचे सांगितले होते. कंगनाने सांगितले होते की, ते एका टोळीचा भाग आहे जी ‘बाहेरील लोकांना’ त्यांचे जीवन संपवायला भडकवतात. त्यानंतर काही दिवसांनी जावेद अख्तर यांनी कंगना रणौतवर मानहानीचा खटला दाखल केला.

या प्रकरणानंतर कंगनाने जावेद अख्तर यांविरोधात तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीत कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर ‘खंडणी आणि गुन्हेगारी धमकी’ असे म्हटले होते. कंगनाने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, २०१६ मध्ये ती बहीण रंगोली चंदेलसोबत जावेद अख्तर यांच्या घरी गेली होती. त्यावेळी कंगना आणि ऋतिक रोशनच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. कंगनाने आरोप केला होता की, जावेद अख्तरने तिला दुर्भावनापूर्ण आणि वाईट हेतूने आणि धमकावून घरी बोलावले.

न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पक्षपातीपणाशिवाय न्याय मिळणार नाही, अशी भीती दाखवणाऱ्या कोणत्याही पुराव्याअभावी अशा अर्जावर विचार करता येणार नाही. कोर्टाने म्हटले आहे की, कंगना रणौतकडे कोणताही पुरावा नाही की, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हा खटला निष्पक्षतेने निकाली काढत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने (सीएमएम) अभिनेत्रीची अशीच याचिका फेटाळली होती. त्यानंतर या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले. मात्र, ती पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आली. (actress kangana ranaut and javed akhtar sue in court)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खान पडला पूजाच्या प्रेमात, ‘किसी का भाई किसी की जान’चे नवीन गाणे रिलीज, एकदा पाहाच

‘मी माझी पहिली सेलिब्रिटी सही घेतली’ अभिनेता ऋतुराज फडकेने सुनील बर्वेबद्दल शेअर केली खास पोस्ट

हे देखील वाचा