अभिनेता रणदीप हुड्डाने आपल्या अनेक भूमिकेतून चाहत्यांना नेहमी खुश केले आहे. त्याने जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळेच रणदीपचे भारतातच नव्हे, तर जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याचे सोशल मीडियावरही जबरदस्त फॉलोवर्स आहेत. रणदीपची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. सध्या रणदीपची आणि त्याच्या चाहत्याची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नुकताच टोकियो ऑलिंपिकमधील भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या भारत देशाला जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या नीरज चोप्राने अभिनेता रणदीपबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. नीरजच्या या प्रेमाला पाहुण रणदीपही स्वतःला रोखू शकला नाही. रणदीपने त्याच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नीरजने मान्य केले की, त्याला रणदीप हुड्डा प्रचंड आवडतो आणि तो त्यावर खूप प्रेम करतो.
तसेच नीरजला रणदीपचा चित्रपट ‘लाल रंग’ हा खूप आवडतो. नीरज म्हणाला की, “‘लाल रंग’ या चित्रपटातील रणदीप यांच्या अभिनयाच्या प्रेमात पडलो आहे.” तसेच त्याने एक ‘लाल रंग’ चित्रपटातील प्रसिद्ध डाॅयलाॅग म्हटला आहे. “हवा में परनाम बाऊजी.” तसेच ‘सरबजीत’ आणि ‘हायवे’ हे पण चित्रपट नीरजला खूप आवडतात.
हा व्हिडिओ शेअर करत रणदीपने हरियाणवी भाषेचा वापर केला आहे. व्हिडिओ शेअर करत रणदीपने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बाऊजी बाऊजी नीरज चोप्रा, हवा में परनम बाऊजी, आजा काडे, तेरा जुखाम ठिक करावां.” रणदीप हुड्डाची ही पोस्ट पाहून नीरजचे अनेक चाहते त्यावर प्रक्रिया देत आहेत.
टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचकित केले. या शानदार कामगिरीमुळे नीरजने केवळ सुवर्ण जिंकले नाही, तर त्याने इतिहास रचला. नीरजने सुवर्णपदक जिंकले, तेव्हा रणदीपने एक अतिशय मजेदार ट्वीट केले होते. त्याने सुपरस्टार रजनीकांत यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “जर तुम्ही नीरज नीरज नीरज बोललात तर तुम्हाला रजनी रजनी रजनी ऐकायला मिळेल.”
नीरजच्या कामगिरीनंतर रणदीप हुड्डाव्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा करीनाने कॅटरिनाला म्हटले होते आपली ‘वहिनी’, पाहण्यालायक होती रणबीरची रिऍक्शन