बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता रणवीर सिंगने मागील काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष वेधले आहे. रणवीर सतत त्याच्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. रणवीर त्याच्या दमदार अभिनयासोबतच हटके ड्रेसिंग सेन्स आणि विचित्र कृतीमुळे चर्चेत असतो. आता रणवीर सिंगने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रणवीर(Ranveer Singh) एनबीए प्लेयर जियानिससोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रणवीर एनबीए खेळाडूला डान्स शिकवताना दिसत आहे. यानंतर दोघेही एकत्र डान्स करत आहेत. रणवीर सिंगचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव करत आहेत.
व्हिडीओवर कमेंट करत टायगर श्रॉफने लिहिले, “ओह, शी ब्रो.” तर अनेक चाहत्यांनी “व्वा.” असे लिहिले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “त्याची उंची किती कमी आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “पुढच्या वेळी हार्डनसोबत भांगडा करू.”
View this post on Instagram
लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंगने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो नुकताच ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. या चित्रपटात रणवीर सिंगने गुजराती व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्याशिवाय इतर अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. रणवीर सिंगचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप पसंत केले जातात. त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे.
न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत होता रणवीर सिंग
रणवीर सिंग नुकताच त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता. त्यामुळे त्याच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर त्याने आपली छायाचित्रे मॉर्फ करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सध्या फाेटाेजचा तपास सुरू आहे. जर तपासात कळले की, फाेटाेसाेबत छेडछाड करण्यात आली आहे. तर, मुंबई पाेलिस या प्रकरणी रणवीर सिंगला क्लिन चीट देईल. रणवीर सिंगने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच पसंती मिळत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा:
फीफा वर्ल्डकपचे एँथम साँग रिलीज, नोरा फतेहीने भन्नाट डान्स करून रचला इतिहास
‘प्रजातंत्र’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रितेश अन् काजल राघवानीचा हॉट रोमान्स चर्चेत