व्हिडिओ: सुपरस्टार रणवीर सिंगने केले कपिल देव यांना किस? पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चाललंय?’


बहुप्रतिक्षित ‘८३‘ चित्रपट शुक्रवारी (२४ डिसेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी कलाकार आणि माध्यमांसाठी याची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. या क्षणी सुपरस्टार रणवीर सिंग, दीपिका पदुकोण तसेच १९८३ च्या विश्वचषकाचे हिरो आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देवही आले होते. दरम्यान त्यांचे फोटो काढण्यासाठी पॅपराझी खूपच उत्सुक होते. मात्र, यावेळी एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे रणवीर आणि कपिल देव जोरदार ट्रोल होत आहेत.

फोटो होतायत व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये रणवीर आणि कपिल देव यांचा ब्रोमान्स पाहायला मिळत आहे. दोघे एकमेकांचे अभिनंदन करत असताना हा फोटो क्लिक करण्यात आला होता. प्रेक्षकांना असे वाटले की, दोघे किस करत आहेत. फोटो पाहिल्यावर तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. नेटकरी रणवीर सिंगला विचारत आहेत की, ‘काय चाललंय…?’

नेटकरी करतायत ट्रोल
चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगला ‘८३’ च्या ट्रेलरवरूनच जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे, रणवीर आणि टीम त्यांच्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. बुधवारी (२२ डिसेंबर) एका स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर रणवीर आणि दीपिकाचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळाला.

स्टायलिश अंदाजात दिसला रणवीर सिंग
या खास कार्यक्रमासाठी रणवीरने पांढऱ्या रंगाचा पोशाख निवडला होता. त्याने काळ्या रंगाचे सनग्लासेस, काळ्या रंगाच्या शूजसह त्याचा स्टायलिश लूक पूर्ण केला होता. तसेच त्याने केसांची पोनीटेल केली होती. कपिल देवही स्टायलिश लूकमध्ये होते. दीपिका पदुकोणबद्दल सांगायचे झाले, तर तिने प्लंगिंग नेकलाईनचा काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

येत्या २४ डिसेंबरला होणार चित्रपट प्रदर्शित
रणवीर सिंगचा ‘८३’ हा चित्रपट भारताच्या १९८३ विश्वचषकावर आधारित आहे. दीपिका आणि रणवीरव्यतिरिक्त या चित्रपटात पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, एमी विर्क, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना, जीवा आणि इतरही कलाकार आहेत. ‘८३’चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. तसेच याच्या निर्मितीची जबाबदारी कबीर खान, दीपिका पदुकोण, विष्णुवर्धन इंदुरी, साजिद नाडियादवाला यांनी घेतली आहे.

या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!