‘पनामा पेपर्स’ प्रकरणातील चौकशीनंतर ऐश्वर्याची पहिली पोस्ट चर्चेत, पती अभिषेकनेही केली कमेंट


बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी ‘मिस वर्ल्ड’ ऐश्वर्या राय बच्चन सध्या भलतीच चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे ‘पनामा पेपर्स लीक’ प्रकरणासंदर्भात झालेली चौकशी होय. मागील सोमवारी (२० डिसेंबर) ऐश्वर्या ईडी कार्यालयात उपस्थित होती. यानंतर आता अभिनेत्रीने पहिल्यांदाच सोशल मीडिया पोस्ट केलीय, जी चांगलीच व्हायरल होत आहे. खरं तर, हा थ्रोबॅक फोटो आहे.

ऐश्वर्याने (Aishwarya Rai Bachchan) शेअर केलेल्या या थ्रोबॅक फोटोत तिची आई वृंदा राय आणि दिवंगत वडील कृष्णराज राय दिसत आहेत. खरं तर, ऐश्वर्याने आपल्या आई- वडिलांच्या ५२ व्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याच्या या पोस्टवर तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चननेही (Abhishek Bachchan) कमेंट केली आहे.

ऐश्वर्याच्या पोस्टवर अभिषेक बच्चनची कमेंट
ऐश्वर्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या आई-वडिलांचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले आहे की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी डार्लिंग आई दोड्डा- बाबा अज्जा… तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुमच्या बिनशर्त प्रेम आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद. नेहमी प्रेम.”

तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. या सर्वांमध्ये अभिषेक बच्चनच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने कमेंटमध्ये हार्ट इमोजीचा समावेश केला आहे.

वडिलांच्या वाढदिवशीही केला होता फोटो शेअर
ऐश्वर्याने २० नोव्हेंबर, २०२१ रोजी तिच्या दिवंगत वडिलांचा एक फोटो शेअर केला होता. त्यासोबतच तिने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. फोटोसोबतच ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हॅपी बर्थडे माय डार्लिंग डॅडी-अज्जा. तुमच्यावर कायम प्रेम आहे.” या पोस्टवरही अभिषेक बच्चनने कमेंट केली होती.

सन २०१७ मध्ये झाला होता तिच्या वडिलांचे निधन
ऐश्वर्याचे वडील कृष्णराज लष्करात जीवशास्त्रज्ञ होते. २०१७मध्ये मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या निधनामुळे ऐश्वर्या खूप दुःखी होती. ती प्रत्येक प्रसंगी त्यांची आठवण काढते आणि तिच्या सोशल मीडिया हँडलवर थ्रोबॅक फोटो पोस्ट करत असते. यंदाच्या ‘मातृदिना’च्या निमित्तानेही तिने तिच्या पालकांसोबतचे फोटो शेअर केले होते.

ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. या जोडप्याला दहा वर्षांची मुलगी असून तिचे नाव ‘आराध्या’ बच्चन आहे. गेल्या महिन्यात आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती मालदीवला गेली होती.

ऐश्वर्याने ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमात काम केले होते. त्यामध्ये, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘गुरु’, ‘गुजारिश’, ‘धूम २’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर, ती दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नीयन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!