बाॅलिवूडचा ‘गल्ली बाॅय’ म्हणजेच रणवीर सिंगने मागील काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो सतत त्याच्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. रणवीर त्याच्या दमदार अभिनयासोबतच हटके ड्रेसिंग सेन्स आणि विचित्र कृतीमुळे चर्चेत असतो. न्यूड फोटोशूटमुळे भलताच चर्चेत आलेला रणवीर आता एका लहान मुलांसाेबतच्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
नुकतंच रणवीरला (Ranveer Singh) एका ठिकाणी स्पाॅट केलं गेलं, ज्यावेळी ताे कुठेतरी जात हाेता. त्याने बघितले की, त्याला भेटायला काही लहान मुलं आले आहेत त्यावेळी त्याने लहान मुलांना निराश न करता भेटला आणि पॅपराजीला पाेज देखील दिल्या. त्याच्या या अंदाजामुळे तेथे हजर असलेल्या लाेकांचे मन जिंकले. रणवीरचा हा बिंदास अंदाज साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. तर युजर रणवीरवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, “हा खराेखर देव माणुस आहे.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “रणवीर बेबी.” अशातच एक युजर म्हणताे, “हा रणवीर सिंग आहे. नाॅर्मल कपड्यांमध्ये? शक्यच नाही.”
न्यूड फोटोशूटमुळे विरोधाला सामोरे जाणाऱ्या रणवीर सिंगने मुंबई पोलिसांना दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, “त्याच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे”. मुंबई पोलिसांसमोर नोंदवलेल्या त्याच्या वक्तव्यानुसार ते फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेले नाहीत. तो म्हणाला की,”जे न्यूयॉर्क पेपर मॅगझिनचा भाग आहे. ते फोटो मी शेअर केले नाहीत.” त्याच्या फोटोशी छेडछाड करून अश्लीलता पसरवली आहे.
सध्या फाेटाेजचा तपास सुरू आहे. जर तपासात कळले की, फाेटाेसाेबत छेडछाड करण्यात आली आहे. तर, मुंबई पाेलिस या प्रकरणी रणवीर सिंगला क्लिन चीट देईल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा:
भांडं फुटलं की! सोनाक्षी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात; वरुणही म्हणाला, ‘याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी’
‘बंद होण्याच्या मार्गावर होती कन्नड इंडस्ट्री, केजीएफ बनवून रचला इतिहास’, मांजरेकरांनी गायलं गुणगान
सुंदर अन सोज्वळ! वीणा जगतापच्या लूकची नेटकऱ्यांना पडली भुरळ