बॉलिवूडचा एनर्जी किंग अर्थातच रणवीर सिंग या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाने आणि आपल्या एनर्जेटिक अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. तसेच, नेहमी आपल्या नवीन अंदाजातले फोटो शेअर करत असतो. रणवीरने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे या व्हिडिओमध्ये.
काही दिवसांपासून रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा उत्साहित अंदाज लपल्यासारखा दिसत होता. मात्र, या व्हिडिओमुळे तो पुन्हा एकदा त्याच अंदाजात परतल्यासारखा वाटत आहे. असा एकही अभिनेता किंवा अभिनेत्री नसेल जी विरल भयानी (Viral Bhayani) याच्या कॅमेऱ्यापासून वाचले असतील. रणवीरलाही अशाचप्रकारे अचानक स्पॉट केले आणि त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रणवीर सिंग (Ranveer Singh) नेहमीच एवढा उत्साहित असतो की, त्याला पाहून दुसऱ्या माणसालाही उत्साह येतो. या व्हिडिओमध्ये तो पुन्हा एकदा त्याच उत्साहात दिसला. रणवीरला अचानक एका जागेवर स्पॉट केले, जेव्हा तो कुठेतरी जाण्यासाठी निघला होता. तेवढ्यातच त्याचे चाहते आणि काही लहान मुले त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्या गाडीजवळ येऊन थांबतात. रणवीर त्यांच्या भावना न दुखावता लहान मुलांसोबत हात मिळवतो आणि मीडियासमोर येऊन पोझ देतो. त्याने त्याच्या बिंधास्त अंदाजाने तिथे जमा असलेल्या लोकांची मनं जिंकली होती.
रणवीर सिंगचा हा बिंधास्त अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो चांगलाच चर्चेत आला आहे. चाहते खूप खुश झाले आहेत आणि रणवीरचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओत दिसते की, जेव्हा रणवीर गाडीपशी येतो आणि त्याला लहान मुले थांबताना दिसतात, तर तो लगेच त्यांना जाऊन भेटतो, हात मिळवतो, तेव्हा ती लहान मुले खूपच खुश होतात. त्याच उत्साहात तो मीडियासमोर जाऊन फोटोही काढतो आणि मग गाडीकडे जातो.
फोटोसोबत झाले आहे चुकीचे कृत्य
गेल्या काही दिवसांपूर्वी रणवीर न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) केल्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता, आणि यामुळे त्याला पोलिसांच्या प्रश्नांना समोरे जावे लागले होते. मात्र, त्याने आपल्या वक्तव्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की, त्याच्या फोटोसोबत कोणीतरी चुकीचे कृत्य केले आहे. मुंबई पोलिसांच्या समोर दिलेल्या वक्तव्यानुसार, त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले नव्हते.
त्याचे म्हणणे आहे की, त्याने हे फोटो शेअर केले नाही. त्याचे हे फोटोशूट न्यूयाॅर्कमध्ये स्थित असलेल्या पेपर मॅगझिनसाठी केले होते. मात्र, त्याच्या फोटोसोबत कोणीतरी चुकीचे कृत्य करून अश्लिलता पसरवण्याचे काम केले आहे. सध्या या फोटोची पडताळणी सुरू आहे. जर या फोटोमध्ये खरंच चुकीचे कृत्य केले असेल, तर रणवीर सिंगला निर्दोष म्हणून सोडले जाईल असे म्हटले जात आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘फक्त सेक्सचा विचार करता येतो’, आमिरच्या भावाची बॉलिवूडवर आगपाखड; रिमेक बनवणाऱ्यांवरही चांगलाच भडकला
‘मृत्यूपूर्वीही आणखी एक मृत्यू असतो…’, उर्वशीची खळबळजनक पोस्ट व्हायरल, चाहत्यांना आठवला रिषभ
ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून पहिल्याच आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ची विक्रमी कमाई; आलिया म्हणाली…