अवघ्या काही दिवसांतच २०२१ हे वर्ष संपणार आहे. यावर्षी बरेच शो ऑफ ईअर झाले आणि बरेच सुरू झाले. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी टीव्ही स्क्रीनवरही दिसले. त्यांनी केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे, तर छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांची मने जिंकली. टीव्ही शो होस्ट करण्यापासून ते परीक्षण करण्यापर्यंत दिसले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी टीव्ही शोचा चेहरा बनले. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी केवळ रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर टीव्हीच्या पडद्यावरही वर्चस्व गाजवले.
रणवीर सिंग
‘द बिग पिक्चर’ या शोमधून रणवीर सिंग (Ranveer singh) याने टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. हा एक गेम शो आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या ज्ञानातून पैसे कमवू शकतात. त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्याचे होस्टिंग कौशल्य कौतुकास्पद आहे.
बादशाह
लोकप्रिय संगीतकार आणि रॅपर बादशाह (Badshah) यानेही ‘उदारियां’ या सिरीयलचे थीम साँग तयार केले आहे. यासोबतच तो या गाण्याच्या व्हिडिओमध्येही दिसला होता. आजकाल तो ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’चे परीक्षण करत आहे.
अमिताभ बच्चन
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘कौन बनेगा करोडपती १३’ चे सहयोग केले गेले. ज्यामध्ये संपूर्ण कलाकारांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत खूप मजा केली. शोमधील काही पात्र अमिताभ बच्चनसोबत हॉट सीटवरही दिसले.
किरण खेर
अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) कॅन्सरमुळे बेडरेस्टवर होत्या. पण आता त्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट ९’ या रियॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून परतल्या आहेत. शिल्पा शेट्टी अनेकदा किरण खेर यांचे व्हिडिओ शेअर करताना दिसते.
रेखा
रेखा (Rekha) ‘गुम है किसी के प्यार में’ च्या प्रोमोमध्ये दिसल्या होत्या. तेव्हापासून त्या चर्चेत राहिल्या. नील भट्ट आणि आयेशाच्या कथानकातला ट्विस्ट रेखा यांनी दिला होता. यानंतर त्या सलमान खानने होस्ट केलेल्या ‘बिग बॉस १५’ या शोचा भागही होत्या. यामध्ये त्यांनी विश्वसुंदरीचा व्हॉईसओव्हर केला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.
मिथुन चक्रवर्ती
मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) ‘चिकू की मम्मी दूर की’ या डान्सवर आधारित मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसले होते. तेव्हापासून ते चर्चेत राहिले.
हेही वाचा :