Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड राकेश बापटने शेअर केला शमिता शेट्टीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ, एक्स पत्नी रिद्धी डोगराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

राकेश बापटने शेअर केला शमिता शेट्टीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ, एक्स पत्नी रिद्धी डोगराने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

जगभरात व्हॅलेंटाईन डे जोडप्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याचप्रमाणे अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) यांनी एकत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला. दोघेही अलिबागला गेले होते, तिथे ते कुटुंबीय आणि काही मित्रांसह होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत रोमँटिक वेळही घालवला. राकेशने शमितासोबत घालवलेल्या खास क्षणांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर त्याची एक्स पत्नी रिद्धी डोगराची (Riddhi Dogra) प्रतिक्रियाही आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, राकेश आणि शमिता दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत आणि ते किस करणार असतानाच कॅमेरा दुसरीकडे वळवला.

व्हिडिओ शेअर करताना राकेशने  लिहिले की, “जीवनात एकदा तरी प्रेम तुम्हाला परीकथेचं जग अनुभवायला भाग पाडतं. शमिता शेट्टीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.” राकेशच्या या पोस्टवर रिद्धीने एक इमोजी पोस्ट केला आणि लिहिले की, “तुम्ही दोघे नेहमी असेच एकत्र राहा.” त्याचवेळी शमिताने राकेशसोबत एक बूमरँग शेअर करत लिहिले, “माझा व्हॅलेंटाईन राकेश बापट. तू माझी सर्वोत्तम भावना आहेस. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.”

‘कसे’ भेटले दोघे
राकेश आणि शमिता यांची भेट ‘बिग बॉस ओटीटी’ या शोमध्ये झाली होती. पहिल्याच दिवशी शमिताने राकेशला तिचा जोडीदार म्हणून निवडले होते. कारण बिग बॉसच्या घरात जोडीदार निवडला तरच प्रवेश मिळणार होता. घरात प्रवेश केल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले. राकेश आणि शमिता यांच्यात अनेकवेळा रोमँटिक सीनही पाहायला मिळाले.

यानंतर, जेव्हा शो संपला तेव्हा दोघेही लंच किंवा डिनर डेटवर जाताना अनेकदा स्पॉट झाले. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल पोस्ट करत होते. पण त्यानंतर शमिताची ‘बिग बॉस १५’मध्ये एन्ट्री झाली आणि याच दरम्यान राकेशही आला. पण त्यानंतर राकेश शोमधून बाहेर पडला, त्यानंतर शमिता त्याच्यावर चिडली. असे वाटत होते की, शमिता आणि राकेशचे नाते संपले आहे. पण नंतर फायनलमध्ये राकेश शमिताला पाठिंबा देण्यासाठी आला.

यानंतर दोघांनी शमिताचा ‘बिग बॉस’ प्रवास सेलिब्रेट केला. त्यानंतर शमिताच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांनी एकत्र वेळ घालवला. विशेष म्हणजे राकेश शमिताच्याच नव्हे, तर शेट्टी कुटुंबाशीही खूप जवळचा झाला आहे. तो शमिताची आई, तिची बहीण शिल्पा शेट्टी आणि मेहुणा राज कुंद्रासोबतही वेळ घालवतो. शमिताच्या घरच्यांनाही राकेश आवडतो.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा