Wednesday, March 22, 2023

तेजस्वी प्रकाशवर राकेश बापट संतापला, म्हणाला ‘शमिता शेट्टीला करण कुंद्रामध्ये रस नाही’

‘बिग बॉस १५’ आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत शोबद्दल प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. लवकरच आता ‘बिग बॉस १५’ चा विजेता निश्चित होणार आहे. शनिवारी आणि रविवारी ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे. सर्व बीबी चाहत्यांना खूप मजा येणार आहे. कारण फिनालेमध्येही चाहत्यांना वाद पाहायला मिळणार आहे. तुम्ही म्हणाल फिनालेत कोण भांडण करत का? हाच विचार प्रत्येकजण करत असतो, पण दुष्मणी इतकी भयंकर आहे की, कुठेही कधीही भांडण होऊ शकते.

राकेश बापट तेजस्वीवर भडकला

फिनालेच्या प्रोमोमध्ये तेजस्वी प्रकाश आणि शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांच्यात जोरदार भांडण रंगणार आहे. तेजस्वीचा (Tejaswi Prakash) करण कुंदाबाबत अनेकदा तेजस्वी इंसिक्योर झाली आहे, त्यामुळे शमिता शेट्टीशी भांडण झाले आहे. तेजस्वीचे गर्लफ्रेंडसोबतचे असे वागणे राकेश बापटला आवडले नाही. तो फिनालेला आला आणि त्याने तेजस्वी प्रकाशला समोर घेऊन, राकेशने स्पष्टपणे सांगितले की, शमिताला करण कुंद्रामध्ये काहीही रस नाही.

शमिताचा बॉयफ्रेंड राकेश बापट (Raqesh Bapat) तेजस्वी प्रकाशवर निशाणा साधताना म्हणाला की, “तू हे सगळं का करत आहेस? शमिताला करण कुंद्रामध्ये रस नाही. मला खूप राग येत होता म्हणून मी टीव्ही तोडावा असा विचार करत होतो. ते हास्यास्पद आहे.” आपली बाजू मांडत तेजस्वी म्हणते की, “ही ऍक्शनची रिऍक्शन आहे.” वाद सुरू असतानाच शमिता बोलते, मग तेजस्वी शमिताला असुरक्षित म्हणते.

यानंतर तेजस्वी आणि शमिता यांच्यात भांडण सुरू होते. बीबी फिनाले एपिसोडमध्ये दोन स्पर्धकांमध्ये हाणामारी होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. तुम्ही सुद्धा रात्री ८ पर्यंत पूर्णपणे मोकळे व्हा, सर्व कामे पूर्ण करा, जेणेकरून तुम्ही विसरूनही हा मजेदार भाग चुकवू नये.

हेही वाचा :

हे देखील वाचा