Saturday, July 6, 2024

‘मी नेहमीच तिला पाठिंबा दिला आणि तिने…’, म्हणत राकेशने शमितासोबतच्या नात्याबद्दल भावना केल्या व्यक्त

राकेश बापट आणि शमिता शेट्टी ही ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडी आहे.  दोघांमधील हे नाते प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मात्र, ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना बंधनातून मुक्त करताच दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. दिव्याबाबत या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. निर्मात्यांनी अलीकडेच शोचा एक प्रोमो प्रदर्शित केला, ज्यात राकेश बापटशी झालेल्या भांडणात शमिता शेट्टी खूप दुःखी दिसत आहे आणि नेहा भसीनसोबत तिच्या मनातील गोष्टी शेअर करत आहे.

कोणतीही आशा देण्याची इच्छा नव्हती
शमितानंतर आता नेहा भसीनसोबत राकेश बापटनेसुद्धा आपल्या मनातील गोष्टी सांगितल्या की, त्याला कोणतीही आशा ठेवायची नाही. राकेशने शमितासोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली. राकेश म्हणाला, “मला इथे येऊन कोणत्याही बंधनात अडकायचे नव्हते. हे नाते सोडा, हे सर्वांसोबत घडते, पण मी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करण्याच्या किंवा कोणालाही आशा देण्याच्या विरोधात होतो.”

शमिताला पूर्ण पाठिंबा दिला
राकेश बापटने नेहा भसीनला आपले मनातले सांगितले आणि म्हणाला, “मी शमिताला पूर्ण पाठिंबा दिला. जेव्हाही ती भावनिकरीत्या तुटली, तेव्हा मी तिच्यासाठी नेहमीच तिथे उभा होतो.” राकेश पुढे म्हणाला की, “ती नेहमीच माझ्याकडून तिच्या पाठीशी उभी राहण्याची अपेक्षा करू शकत नाही. त्या बदल्यात तिने मला पाठिंबा द्यावा आणि नेहमी माझ्या पाठीशी उभे राहावे अशी माझी इच्छा आहे.”

चेहऱ्यावर दाखवत नाही याचा अर्थ असा नाही की…
या प्रोमोमध्ये राकेश असे म्हणताना दिसत आहे की, “कारण मी हे दाखवत नाही की मी आतून तुटलेला आहे. याचा अर्थ असा नाही की, माझ्या मनात काहीच चालले नाही. फक्त मी चेहऱ्यावरून मजबूत आहे याचा अर्थ असा नाही की, मी आतून तुटलेली नाही. मी शमिताला सांगितले की, दोन तुटलेले व्यक्ती इथे आले आहेत, ही एक साधी बाब आहे की, ठिणगी तर पडणारच ना.”

शमिता म्हणते की, त्याच्याकडे दिव्यासाठी आहे सॉफ्ट कॉर्नर
अलीकडेच, नेहा भसीनला तिच्या मनातील गोष्टी बोलताना शमिता म्हणाली होती की, “राकेशच्या मनात दिव्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे. जर कनेक्शन नसते, तर कदाचित तो दिव्याकडे गेला असता. या एका आठवड्यात मी जे काही पाहिले ते अजिबात चांगले नव्हते. मला असे वाटते की, मी त्याच्या मागे जात आहे, पण त्याला काही स्वारस्य नाही. मला चांगले वाटत नाही. खूप मन दुखावले.”

दिव्या बनली शमिता-राकेशच्या वादामागील कारण
शमिता शेट्टी आणि राकेशचे नाते आता चाहत्यांना खूप गोंधळात टाकत आहे. शोमध्ये, या दोघांमधील मैत्री ही मैत्रीपेक्षा अधिक दिसून येते. शमिता शेट्टी कधीकधी राकेश बापटबद्दल सकारात्मक दिसते. शमिता शेट्टीला राकेश बापट आणि दिव्या अग्रवाल यांच्याबद्दल बोलणे अजिबात आवडत नाही. हेच कारण आहे की, काल रात्री ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

हे देखील वाचा