मनोरंजन विश्वात असे अनेक आहेत ज्यांनी टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये काम केले. मात्र या दोन्ही माध्यमांमध्ये त्यांना विशेष यश मिळाले नाही. त्यातल्या त्यात टीव्ही इंडस्ट्रीमुळे त्यांना थोडी ओळख तरी मिळाली. मात्र टीव्ही इंडस्ट्री त्यातल्या त्यात अशा कलाकारांसाठी तारणहार ठरली. असच एक अभिनेता म्हणजे राकेश बापट उर्फ राकेश राकेश वशिष्ठ. बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक असणारा राकेश आज (१ सप्टेंबर ) त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.
राकेशच्या जन्म १ सप्टेंबर १९७३ रोजी विदर्भातील अमरावती या शहरात झाला. राकेशच्या वडील मनोज बापट भारतीय संरक्षक दलात होते. राकेश लहान असल्यापासून त्याला चित्रकला खूप आवडायची त्याला चित्रकलेत राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. राकेशने या ग्लॅमर जगात येण्यापूर्वीच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्याने ‘मिस्टर पुणे’ का किताब देखील स्वतःच्या नावावर केला.
राकेशने २००१ साली ‘तुम बिन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा यशस्वी झाला आणि राकेश ला देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. या सिनेमानंतर तो ‘दिल विल प्यार व्यार’, ‘जय संतोषी माता’, ‘हिरोइन’, ‘जादू सा चल गया’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र ‘तुम बिन’ सिनेमाला मिळालेले यश त्याला पुन्हा मिळू शकले नाही. त्यानंतर त्याने त्याचा मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवला. मराठीमध्ये तो ‘आयना का बायना’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘वृंदावन’,’सर्व मंगल सावधान’ आदी सिनेमे केले.
राकेश हिंदी मालिकांमध्ये देखील झळकला होता. ‘मर्यादा: लेकिन कब तक’, ‘कुबुल हैं’, ‘तू आशिकी’ ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘इश्क मैं मारवाजा’ आदी मालिकांमध्ये काम केले. ‘मर्यादा: लेकिन कब तक’ या मालिकेदरम्यान त्याची भेट त्याची सहकलाकार असणाऱ्या रिद्धी डोगरासोबत झाली. पुढे ते प्रेमात पडले आणि त्यांनी २०११ साली लग्न केले. रिद्धी ही माजी केंद्रीय मंत्री स्वर्गवासी नेते असणाऱ्या अरुण जेटली त्यांची पुतणी आहे. मात्र दुर्दैवाने २०१९ साली त्यांनी काही कारणास्तव घटस्फोट घेतला.
सध्या राकेश सिंगल आहे. मात्र बिग बॉसच्या घरात त्याची आणि शमिता शेट्टी जवळीक मीडियामध्ये चांगलीच गाजत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट
-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’
-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण