Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड भोजपुरी सुपरस्टार रवी किशनच्या सर्व सुखसोयींनीयुक्त अशा आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?

भोजपुरी सुपरस्टार रवी किशनच्या सर्व सुखसोयींनीयुक्त अशा आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?

खासदार आणि अभिनेता रवी किशनने आज त्याच्या अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. सुरुवातीला अतिशय संघर्षात जीवन जगणाऱ्या रवीने आज मेहनतीच्या जोरावत यश मिळवले आहे. भोजपुरी, दाक्षिणात्य चित्रपटांसह त्याने बॉलिवूडमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. तसेच राजकारणात देखील त्याने स्वतःची छाप उमटवली आहे. साल १९९२ मध्ये ‘पितांबर’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘जखमी दिल’, ‘आग और चिंगारी’, ‘जय हनुमान’, ‘लक’, ‘रावण’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. रवीने हिंदीसह तामिळ, तेलगू आणि भोजपुरी भाषिक चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. त्याच्या दमदार अभिनयाने त्याने चाहत्यांची आणि समीक्षकांची मने जिंकली. साल २००६ मध्ये तो ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वात देखील झळकला होता.

यशाचे शिखर गाठत असताना त्याने खूप मेहनत घेतली. त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीनेच त्याने आभाळाएवढे यश संपादन केले आहे. रवी हा एका मध्यम वर्गीय कुटुंबातून येतो. चित्रपटात काम करताना सुरुवातीच्या काळात तो एका छोट्याश्या घरात १२ लोकांबोबर राहत होता. परंतु आता त्याने मोठे वैभव आणि बक्कळ संपत्ती कमावली आहे. सुरुवातीच्या काळात छोट्याशा घरात राहणार रवी आज मोठ्या आणि आलिशान घरात राहतो. बऱ्याचदा तो त्याच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

रवीचे सध्याचे घर मुंबईमधील गोरेगाव येथे एका गगनचुंबी इमारतीत १४ व्या मजल्यावर आहे. त्याचे घर एकूण ८ हजार स्क्वेअर फूटमध्ये व्यापलेले असून, त्यात एकूण १२ खोल्या आहेत. त्याच्या घराची किंमत ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. रवी ज्या घरात राहतो त्याची किंमत ही तब्बल २० कोटींच्या आसपास आहे.

रवीच्या घरामध्ये एक मोठी गच्ची आहे. त्यामुळे त्याच्या घराला खूप सुंदर लूक आलेला आहे. गच्चीवर त्याने आणि त्याची पत्नी प्रीतीने दोन्ही बाजूंना काही झाडे आणि छोटी रोपटी लावली आहेत. त्यामुळे तिथे हिरवळ देखील पाहायला मिळते. तसेच तो नेहमी इथे योगा करताना देखील दिसतो.

रवीने त्याचे घर खूप छान सजवले आहे. कामाच्या व्यापामुळे जिमसाठी बाहेर जाणे त्याला जमत नसल्याने त्याने घरामध्येच एक जिम बनवली आहे. दररोज तो इथेच व्यायाम करतो. तसेच आपली वाचनाची आवड जोपासत त्याने घरामध्ये एक छोटेसे ग्रंथालय देखील तयार केले आहे. इथे तो बराच वेळ वाचन करतो. त्याने संपूर्ण घराला पांढरा शुभ्र रंग दिला आहे. त्यामुळे घरामध्ये पाऊल ठेवताच मन अगदी प्रसन्न होते. तसेच त्याच्या कामासाठी देखील त्याने एका स्वतंत्र खोलीची सुविधा केली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाअष्टमीचे निमित्य साधत अनुष्काने शेअर केला वामिकाचा फोटो, म्हणाली ‘रोज तुझ्यात…’

‘या’ कलाकारांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा