Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या आपली दोन मुलं तैमूर अली खान आणि जेहसोबत वेळ घालवत असून, यावेळी तो मुलांसोबत खूप मजा करत आहे. तो नेहमीच त्याच्या कुटुंबासोबत ट्रिपवर जात असतो जिथे तो त्याच्या दोन्ही मुलांसोबत धमाल आणि खूप मजा करताना दिसतो. सैफ, करीना आणि त्यांची दोन मुलं मीडिया, फॅन्स सर्वांचेच आकर्षण आहे. या सर्वांवर सतत कॅमेरे रोखलेले असतात. त्यांच्या बारीक बारीक गोष्टी देखील मीडियामध्ये मोठा बज तयार करतात.

एका मुलाखतीमध्ये सैफने तैमूरचे कौतुक करत जेह आल्यापासून तो बदलला आहे का? यावर उत्तर देताना सांगितले, “तैमूर घरी दुसरे बाळ (जहांगीर) जन्माला आल्यापासून खूप जबाबदार झाला आहे. तैमूर केवळ त्याच्या लहान भावाची काळजी घेत नाही, तर त्याला आनंदी ठेवण्याचा आणि हसवण्याचा प्रयत्न करतो.” सैफने या मुलाखतीत लॉकडाऊन टप्प्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, “आम्ही त्यावेळी घरी सर्वच एकत्र होतो. हा वेळ आम्ही खूप छान घालवला, पुस्तके वाचली, संगीत ऐकले आणि स्वयंपाक देखील केला.”

सैफ म्हणतो की, “आमच्यापैकी एक खूप काम करत असतो आणि दुसरा थोड कमी करतो. प्रत्येक जणं कुटुंबासाठी वेळ काढत असतो. आम्ही हा समतोल राखतो.” सैफने या मुलाखतीत हे देखील सांगितले की, तो आणि करीना कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहेत, मुलांना वेळ देणे आणि स्वयंपाक करणे त्यांना खूप आवडत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सैफ अली खानचा ‘भूत पोलिस’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसले होते. तो लवकरच प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार आहे. त्याने नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सैफ अली खान आणि प्रभाससोबतच क्रिती सेनन आणि सनी सिंग देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर करीनच बहुप्रतीक्षित असा आमिर खानसोबतच ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’, अभिनेत्रीची सोज्वळता पाहून चाहत्याने ठेवला थेट लग्नाचा प्रस्ताव

-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक

-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

हे देखील वाचा