बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखरस्थान गाठले आहे. त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी आयुष्यात प्रचंड संघर्ष करावे लागले आहेत. अनेक कलाकारांनी धैर्य, मेहनत आणि मोठ्या चिकाटीने आयुष्यात यश मिळवले आहे. आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत. ते कलाकार इतर कोणी नसून प्रसिद्ध अभिनेते रवी किशन आहेत. चला तर मग त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि माहित नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशन
सुपरस्टार रवी किशन हे केवळ भोजपुरीतच नाही, तर हिंदी चित्रपट विश्वात देखील त्यांना आज त्यांचा परिचय देण्याची कसलीच गरज नाही. त्यांची ओळख फक्त एक कलाकार म्हणूनच नाही, तर राजकीय नेते म्हणूनही आहे. ते आता भाजप खासदार आहेत. आज त्यांची इतकी प्रतिष्ठा असली, तरी एक काळ असा होता की, त्यांना कोणी ओळखत देखील नव्हते आणि कुटुंबाला आलिशान आयुष्य देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते.
वडिलांनी दिले होते प्रोत्साहन
रवी किशन यांना त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीच्या काळात अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रचंड काम करावे लागले होते. रवी किशन जेव्हा दिवसभर काम करून थकून घरी यायचे, तेव्हा त्यांचे धैर्य संपलेले असायचे. मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांना साथ देत त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची हिम्मत दिली. त्यांचे वडील त्यांना पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत होते. कदाचित त्यामुळेच ते आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.
शेत गहाण ठेवून मुलीला आणले होते घरी
माध्यमांतील वृत्तानुसार, ज्यावेळी रवी किशन यांची मुलगी जन्माला आली होती, तेव्हा त्यांच्याकडे त्यांची पत्नी व मुलीला डिस्चार्ज देऊन दवाखान्यातून घरी आण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते. अभिनेत्यावर त्यावेळी आपल शेत गहाण ठेऊन व्याजावर पैसे घेऊन त्यांना आपल्या मुलीला घरी आणावे लागले होते.
रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारल्याने व्हायची मारहाण
रवी किशन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ते जेव्हा लहान होते, त्यावेळी ते रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारत होते. मात्र, त्यांच्या घरच्यांना ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती. त्यामुळेच त्यांना खूप मारहाण देखील करण्यात आली होती. परंतु त्यांना अभिनयाची इतकी आवड होती की, त्यांनी लहान असतानाच घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. २००३ मध्ये त्यांच्या पहिल्या भोजपुरी चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्यांनी मनोरंजन विश्वात आपली एक ओळख निर्माण केली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस ओटीटी’चा किताब जिंकून घरी परतली दिव्या; बॉयफ्रेंड वरुणने खास अंदाजात केले स्वागत
-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा
-बाकीच्या पर्वांपेक्षा खास आहे हे पर्व; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं बघू शकाल सलमानचा ‘बिग बॉस’