हॉलिवूडमधून अंगाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता रायन ग्रँथम याने त्याच्या आईची निर्घुणपणे हत्या केली होती. यानंतर न्यायालयाने कारवाईचा बडगा उगारत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध शो ‘रिव्हरडेल’मध्ये झळकलेल्या रायनवर त्याच्याच आईची हत्या करण्याचा आरोप आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी त्याने न्यायालयासमोर तो दोषी असल्याचे कबूल केले होते. यानंतर आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार, रायन ग्रँथम (Ryan Grantham) हा त्याच्या आयुष्यात कधीच बंदूकीचा वापर करू शकत नाही. तसेच, 14 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतरही त्याची पॅरोलवर सुटका होणार नाही.
रायनला झाली जन्मठेप
कॅनडातील व्हँकूव्हर येथील ब्रिटिश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयाने रायनला शिक्षा सुनावली आहे. मार्च 2020मध्ये रायनने त्याच्या 64 वर्षीय आईची गोळी घालून हत्या केली होती. रायनने जेव्हा आई बारबरा वेटला गोळी मारली, तेव्हा त्या पियानो वाजवत होत्या. त्यातच त्यांचे निधन झाले. माध्यमांतील वृत्तांनुसार, न्यायाधीश कॅथलिन केर यांनी न्यायालयाचा निर्णय सांगत ही घटना दु:खद, काळीज तोडणारी आणि आयुष्य संपवणारी असल्याचे म्हटले.
अभिनेत्याकडून आईची हत्या
जूनमध्ये, रायनच्या खटल्याच्या फिर्यादीने सांगितले होते की, अभिनेत्याने 31 मार्च, 2020 रोजी त्याच्या आईला गोळ्या घातल्या होत्या. याचा व्हिडिओही त्याने बनवला होता. गो प्रो कॅमेऱ्यावर बनलेल्या हा व्हिडिओत बारबरा वेट यांच्या मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या रायनने ही गोष्ट कबूल केली होती की, त्यानेच त्याच्या आईची हत्या केली आहे. व्हिडिओत तो म्हणत होता की, “मी त्यांच्या डोक्यामागे गोळी मारली आहे. त्यानंतर त्यांना समजले होते की, हे मी केले आहे.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईचा जीव घेतल्यानंतर रायनने बियर आणि अं’मली पदार्थ खरेदी केले होते. यानंतर त्याने मोलोतोव कॉकटेल बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि नेटफ्लिक्स पाहत बसला होता. हे सर्व केल्यानंतर त्याने त्याच्या आईच्या मृतदेहावर चादर टाकून झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्याने त्याच्या आईला पियानोवर झोपवले. त्यांच्या चारही बाजूंना मेणबत्त्या पेटवल्या. यानंतर तो दुसऱ्या हत्येसाठी निघाला होता.
Shocking: Actor Ryan Grantham of Riverdale;sentenced to life imprisonment for killing mother#RyanGrantham #Riverdale #News pic.twitter.com/7dbbybDOsE
— Ruchita Mishra (@rucchitamishra) September 23, 2022
कॅनडाच्या पंतप्रधानांना मारण्याची होती योजना
यानंतर रायन त्याच्या गाडीत तीन गोळ्यांनी भरलेल्या बंदूका, मोलोटोव्ह कॉकटेल, दारूगोळा, कँपिंगचे साहित्य आणि ओटावा रिडो कॉटेजचा नकाशा ठेवला होता. त्याची योजना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना मारण्याची होती. जस्टिन आणि त्यांचे कुटुंबीय रिडो कॉटेजमध्ये राहते. त्यानंतर रायनने पोलिसांसमोर सर्वकाही कबूल केले होते की, तो पंतप्रधानांना मारण्यासाठी निघाला होता. याबद्दल त्याने त्याच्या डायरीमध्येही लिहिले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘बटण लावायला विसरलीस का…’, अभिनेत्री जान्हवी कपूरची विमानतळावर झाली चांगलीच फजिती, व्हिडिओ व्हायरल
हॉटेलमध्ये जेवायला गेला अन् प्रेमात पडला, अभिनेता बॉबी देओलची फिल्मी लवस्टोरी ऐकून व्हाल थक्क
ती एक चूक अन् बॉलिवूडला मिळाला जबरदस्त खलनायक, प्रेम चोप्रा यांचा रंजक किस्सा