चित्रपटपटांनंतर आता टीव्ही मालिकेत वाजणार सचित पाटीलच्या अभिनयाचा डंका, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला


मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत डॅशिंग आणि हँडसम अभिनेता अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे सचित पाटील होय. काही चित्रपटात डॅशिंग, तर काही चित्रपटात रोमँटिक भूमिका निभावून त्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सचितला आपण अनेक चित्रपटात पाहिले आहे, परंतु तो आता टेलिव्हिजनवरील एका मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.

मागील अनेक दिवसापासून आपण स्टार प्रवाह या वाहिनीवर एका नवीन मालिकेचा प्रोमो पाहत आहोत. यामध्ये सचित पाटील हा आपल्याला पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेचे नाव ‘अबोली’ असे आहे. सचित पाटीलची ही मालिका मंगळवारपासून (२३ नोव्हेंबर) दररोज रात्री १०: ३० वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. अभिनेता सचितनेही सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. (Actor sachet patil appear in Marathi serial aboli, give information on social media)

त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याचे चाहते, तर सोडाच अनेक कलाकारही आपापल्या प्रतिक्रिया देऊन त्यांचे प्रेम दर्शवत आहेत. या पोस्टवर अभिनेत्री सोनाली खरे हिने “ओय तू मेरा हिरो,” अशी कमेंट केली आहे. तसेच अनेकजण त्याच्या या पोस्टवर कमेंट करून त्याच्या या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत.

त्याच्या या पोस्टला आतापर्यंत १ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सचित पाटीलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘क्षणभर विश्रांती’, ‘वन वे तिकीट’, ‘क्लासमेट्स’, ‘फ्रेंड्स’, ‘पैसा पैसा’, ‘असा मी अशी ती’, ‘साडे माडे तीन’, ‘अर्जुन’, ‘झेंडा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विक्रम गोखलेंवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अवधूत गुप्तेची भलीमोठी पोस्ट, म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवून…’

-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!

-अर्रर्र! कार्यादरम्यान गायत्रीला झाली दुखापत, ‘बिग बॉस’ने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण आदेश


Latest Post

error: Content is protected !!