Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अबब! ‘विक्रम वेधा’ चित्रपटात सैफने केलाय खऱ्या शस्त्रांचा वापर, जाणून घ्या कशी झाली शूटींग

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) आणि ऋतिक रोशन (Hrithik roshan) यांच्या आगामी ‘विक्रम वेधा‘ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. दोन्ही कलाकारांनी आपापल्या भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सैफ अली खान(Saif Ali Khan) याने या चित्रपटासाठी खऱ्या शस्त्रांसोबत सराव केला होता.

सैफ अली खानने या चित्रपटासाठी खऱ्या बंदुकींचा सराव करण्यापासून ते त्यांचे पात्र पडद्यावर खरे दिसावे यासाठी खऱ्या बंदुकीचा आवाज आणि मॅकेनिज्म समजून घेण्यापर्यंत सर्व काही केले. सैफने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि त्याच्या पात्रात स्वीकारल्या.

सैफ अली खानने पोलिसांच्या बंदुका पकडण्याच्या पद्धतीपासून गुंडांच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यापर्यंत सर्वकाही सखोल माहिती करून घेतली. दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री म्हणाले, “स्क्रिप्टची मागणी असल्याने सैफने एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिसांचे पात्र साकारावे अशी आमची इच्छा होती. सैफने खूप मेहनत घेतली आहे, ज्याचे आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

‘विक्रम वेधा’चे कथानक नाट्यमय वळणांनी भरलेले आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (ऋतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचे दर्शन घडते.

चित्रपटाचा टिझर रिलीझ झाला असून शिट्ट्या वाजवण्याजोगे संवाद, मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक पार्श्वसंगीत आणि भावूक करणाऱ्या नाट्याने हा टिझर परिपूर्ण आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक पूर्ण पॅकेज असल्याचे संकेत देणारा टीझर खूपच आकर्षक आहे.

ऋतिक आणि सैफ अली खान यांची जोडी पहिल्यांदाच स्क्रिनवर पाहायला मिळनार आहे. विक्रम वेधानंतर ऋतिक ‘फाइटर’ या चित्रपहटातही दिसणार आहे. विक्रम वेधा हा चित्रपट 30 सप्टेंबर या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होेण्यासाठी तयार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘दुःखी लोकांना हसण्याची दैवी देणगी देणाऱ्या सिकंदरला अखेरचा सलाम’, राजूंच्या निधनावर दिग्गज कवी भावूक
फक्त पैशासाठी केला होता ‘बिग बॉस 9’ बॉलिवूड अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा
मोठी बातमी! स्वातंत्र्यसैनिकाच्या बायोपिकमधून मांजरेकर बाहेर, दिग्दर्शन न करण्यामागील कारण आले समोर

हे देखील वाचा