Friday, April 19, 2024

मोठी बातमी! स्वातंत्र्यसैनिकाच्या बायोपिकमधून मांजरेकर बाहेर, दिग्दर्शन न करण्यामागील कारण आले समोर

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते अशा विविध भूमिका वठवणारे महेश मांजरेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशात ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते चर्चेत आलेत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या सिनेमामुळे. सुरुवातीला या सिनेमाचे दिग्दर्शन मांजरेकर करणार होते, पण आता त्यांनी या प्रोजेक्टवर काम करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. अद्याप सिनेमाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा करण्यात आली नाहीये.

असे म्हटले जात आहे की, ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन आणि इतर प्रोजेक्ट्समुळे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या सिनेमापासून दूर झाले आहेत. हाती आलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने स्वत:ला या सिनेमापासून वेगळे केले आहे. विशेष म्हणजे, मांजरेकरांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून सिनेमाची घोषणा केली होती. मार्चमध्ये त्यांनी रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याच्यासोबतचा फोटो शेअर करत सिनेमाबद्दल माहिती दिली होती.

मांजरेकरांचे ट्वीट
महेश मांजरेकरांनी ट्वीट करत लिहिले होते की, “काही कहाणी सांगितल्या जातात आणि काही जगल्या जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बायोपिकचा भाग बनण्यासाठी आभारी, उत्साहित आणि सन्मानित.”

महेश मांजरेकर यांनी मागील काही महिन्यांपूर्वी सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या ‘अंतिम: द लास्ट ट्रूथ’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. दुसरीकडे, त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं, तर ते ‘वीर दौडले सात’ या सिनेमाचे दिग्दर्शन करताना दिसणार आहेत. याव्तिरिक्त त्यांच्या खांद्यावर ‘बिग बॉस मराठी’ या शोच्या चौथ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीदेखील आहे.

दिग्दर्शनाव्यतिरिक्त महेश मांजरेकरांनी अभिनयातही आपला दम दाखवला आहे. ते बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक सिनेमात झळकले आहेत. त्यांनी ‘वाँटेड’, ‘मुंबई सागा’, ‘केसरी’, ‘साहो’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त त्यांनी संजय दत्त याच्यासोबत बनवलेला ‘वास्तव’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अक्षरश: धमाल केली होती. याव्यतिरिक्त त्यांनी ‘हथियार’, ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘पिता’ यांसारख्या सिनेमाचेही दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजूंच्या निधनानंतर पूर्ण खचून गेलीये पत्नी; म्हणाली, ‘मी बोलण्याच्या स्थितीत नाही, एवढंच सांगते…’
ट्रक क्लिनर म्हणून सुरुवात ते पहिली कमाई 50 रुपये , असा होता राजू श्रीवास्तव यांचा संघर्ष
धर्माची खिल्ली ते बिग बॉस स्पर्धकाची मस्करी, ‘या’ कारणांमुळे विवादात अडकले होते राजू श्रीवास्तव

हे देखील वाचा