Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अजय देवगणसमोरच डायरेक्टरने केलेला सैफचा बाजार, एका चापटीत चारलेली धूळ

नव्वदच्या दशकात बॉलिवूड पदार्पण करणारे अनेक अभिनेते आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, सुपरस्टार सैफ अली खान होय. सैफला ओळखत नाही, असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सैफला त्याच्या अस्सल अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत पारंपारिकपणा सोडत वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडल्या, त्यामुळे कदाचित त्याचे अनेक सिनेमे फ्लॉपही ठरले. मात्र, त्याच्या प्रसिद्धीमध्ये काडीमात्र फरक पडला नाही. अशात, बराच काळ लोटल्यानंतर एका चित्रपट निर्मात्याने खुलासा केला आहे की, त्याने त्याच्या ‘कच्चे धागे’ या सिनेमाच्या सेटवर सैफला वाईट व्यवहारामुळे कानाखाली वाजवली होती.

नुकतेच अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्या युट्यूब चॅनेलवर ऍक्शन दिग्दर्शक टीनू वर्मा (Tinu Verma) यांनी चर्चा करत खुलासा केला. त्यांनी सांगितले की, ‘कच्चे धागे’ सिनेमाच्या सेटवर सैफ अली खान (Saif Ali Khan) याला चापट मारली होती. तसेच, कशाप्रकारे ते एका सीनची शूटिंग करत होते, ज्यामध्ये जवळपास ७ कॅमेऱ्यांचा समावेश होता आणि तो चालत्या ट्रेनवरील शॉट असल्याचेही त्यांनी सांगितले.

जेव्हा टीनू वर्मा ‘ऍक्शन’ असे ओरडायचे, तेव्हा सैफ नाचू लागत होता. तसेच, वारंवार प्रयत्न करूनही त्यांना एका कारणामुळे शॉट मिळत नव्हता. कारण, सैफ पूर्ण जोमाने ते करत नव्हता. त्यांनी जेव्हा सैफला याचे कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला की, त्याला फक्त ट्रेनचा आवाज ऐकून नाचण्याची इच्छा झाली. या कारणामुळे या सीनची शूटिंग रद्द करावी लागली.

सैफच्या अशा वागण्यामुळे टीनू वर्मांचा पारा चढला आणि त्यांना सैफला जोरदार चापट मारली. ही चापट इतकी जोरात होती की, सैफ थेट जमिनीवर कोसळला होता. त्यांनी सैफला म्हटले होते की, “जेव्हा तुला तंत्रज्ञाबद्दल आदर वाटेल, तेव्हा मी येऊन शूट करेल.” या चर्चेदरम्यान टीनू यांनी हेही सांगितले की, कशाप्रकारे सैफ त्यावेळी त्याची पत्नी अमृता सिंग हिच्यासोबत माफी मागण्यासाठी आला होता. ते म्हणाले की, “त्यांनी माझी माफी मागितली.”

सैफने माफी मागितल्यानंतर टीनू वर्मा तेव्हा म्हणाले होते की, “सैफ, आयुष्यात जर पुढे जायचे असेल, तर तू तंत्रज्ञांचा आदर केला पाहिजे, जे अभिनेत्यांना सुपरस्टार बनवण्यासाठी मदत करतात. जर तुला त्यांचा सन्मान करायचा नाही, तर त्यांच्यासोबत काम करू नको सोडून दे. नवाबांचा मुलगा आहेस ना तू, वडिलांनी दिलेलं खूप काही आहे, सोडून दे काम करायचं, कशाला घेतो मेहनत. फक्त लोकांचा अपमान करू नको. इतक्या मोठ्या सेटवर मी तुला चापट मारली तुला चांगलं वाटलं का?”

कदाचित सैफला त्याची चूक समजली आणि त्याने व्यवस्थित तो सीन शूटही केला. माध्यमांतील वृत्तानुसार, १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या १९९९ सालच्या ‘कच्चे धागे’ या सिनेमाने तब्बल २९ कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमात सैफसोबत अजय देवगण, मनीषा कोईराला, नम्रता शिरोडकर, सदाशिव अमरापूरकर अशा जबरदस्त कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अगं बाबो ! आपल्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसे सलमान खान तर बिग बॉसमधून कमावतो
बॉलिवूडच्या ‘खलनायका’पासून कसा बनला तो सर्वसामान्यांचा ‘देवदूत’; वाचा खरा हिरो सोनू सूदचा प्रेरणादायी प्रवास
अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद

हे देखील वाचा