Sunday, June 16, 2024

‘गॉडफादर’साठी कशी झाली सलमानची निवड? कास्टिंग काऊचचा उल्लेख करत सलमानचा धक्कादायक खुलासा

साऊथ आणि बॉलिवूड कलाकार आता मोठ्या संख्येने एकमेकांच्या सिनेमात काम करताना दिसत आहेत. विजय देवरकोंडा याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. अशातच बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खान हा साऊथमध्ये पदार्पण करत आहे. सलमान चिरंजीवी यांच्या ‘गॉडफादर‘ या सिनेमातून साऊथमध्ये पहिले पाऊल टाकत आहे. सलमान आणि चिरंजीवी यांनी शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) मुंबईत सिनेमाचा हिंदी ट्रेलर लाँच केला. यानंतर पत्रकार परिषदेत सलमानने सांगितले की, कशाप्रकारे नॉर्थ आणि साऊथच्या सिनेमांना अजून यशस्वी बनवण्यासाठी एकत्र काम केले जाऊ शकते.

सलमान खानला का करायचंय साऊथच्या सिनेमात काम?
सलमान खान (Salman Khan) याने साऊथच्या सिनेमात काम का करायचंय याबाबत सांगितले. तो म्हणाला की, “हे पाहा लोकांना हॉलिवूडला जायचंय. मला साऊथला जायचंय. गोष्ट ही आहे की, एकदा जेव्हा आपण सर्वजण काम करण्यास सुरुवात करतो, तेव्हा कल्पना करा की, आपल्याकडे किती मोठी संख्या असेल. लोक हे इथे पाहतात, लोक हे दक्षिणेत पाहतात, तुमच्याकडे सर्व चित्रपटगृह आहेत. तुम्हाला माहितीये की, चाहते जाऊन मला पाहतात. माझे चाहते, त्यांचे फॅन बनतात, त्यांचे चाहते माझे फॅन बनतात. त्यामुळे प्रत्येकजण वाढत आणि वाढतच जातो. तसेच, ही संख्या खूप मोठी होत जाते. लोक 300-400 कोटी रुपयांबद्दल बोलतात. जर आपण सर्वजण एकत्र आलो, तर आपण 3000-4000 कोटी रुपयांचा आकडाही पार करू शकतो.”

कास्टिंग काऊचबद्दल वक्तव्य
सलमान खान याने कास्टिंग काऊचबद्दलही भाष्य केले. त्याने सांगितले की, त्याला कशाप्रकारे ‘गॉडफादर’ सिनेमासाठी कास्ट करण्यात आले आहे. त्याने हसत-हसत म्हटले की, “कास्टिंग काऊच (Casting Couch) अस्तित्वात आहे. आम्ही थायलंडमध्ये थम्प्स अपची एक जाहिरात शूट करत होतो. आम्ही दोघे एकत्र खाली उतरलो. माझ्याव्यतिरिक्त एकमेव व्यक्ती होता, जो माझ्या सोफ्यावर झोपला आहे, ते चिरू गारू आहेत. आम्ही जवळपास 1.30-2.00 वाजता उतरलो आणि त्यानंतर बसून चर्चा केली. त्यांना एक फ्लाईट पकडायची होती. मी त्याला बेडरूममध्ये जाऊन झोपण्यासाठी सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘मी सोफ्यावर झोपेल.’ आता कसं सांगू की, मी सोफ्यावर झोपतो?”

पुढे बोलताना सलमान म्हणाला की, “तेव्हा माझ्याव्यतिरिक्त एकच व्यक्ती आहे, जो माझ्या सोफ्यावर झोपला आहे. तो म्हणजे चिरू गारू… हे कास्टिंग काऊच आहे, त्यामुळे मला या सिनेमात कास्ट करण्यात आले. ते मला म्हणाले की, ‘या सिनेमात एक छोटा रोल आहे.’ मी त्यांना म्हणालो, जर तुम्ही मला तुमच्या मागे उभे केले, तर ठीक आहे. ते म्हणाले, ‘मी तुम्हाला एक चांगली भूमिका देईल.’ आणि महत्त्वाचं म्हणजे, त्यांनीही तेच केले.”

सलमान खान याच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘किक 2’, ‘किसी का भाई किसी की जान’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बघतोस काय रागानं, गाडी घेतलीया वाघानं! ‘सैफीना’च्या ताफ्यात आलिशान कारचा समावेश, तैमूरने घेतली राईड
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची किडनी झाली खराब, उपचारासाठी कुटुंबाकडे नाहीयेत पैसे

हे देखील वाचा