Sunday, June 16, 2024

बघतोस काय रागानं, गाडी घेतलीया वाघानं! ‘सैफीना’च्या ताफ्यात आलिशान कारचा समावेश, तैमूरने घेतली राईड

कलाकार आणि त्यांची मुलं ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतात. कलाकारांनी नवीन घर घेतले असो किंवा ते नात्यात अडकले असो, चाहत्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीची उत्सुकता लागलेली असते. असेच काहीसे आता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान याच्याबद्दलही झाले आहे. तैमूर नुकताच एका नवीन गाडीतून प्रवास करताना दिसला, त्यामुळे चाहतेही तैमूरला या गाडीत पाहून खुश झालेत.

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांनी नवीन गाडी खरेदी केली आहे. ती गाडी इतर कोणती नसून जीप रँग्लर (Jeep Wrangler) आहे. तैमूर अली खान (Taimur Ali Khan) याच गाडीत बसल्याचे फोटो व्हायरल होतायेत. यामध्ये तैमूरसोबत त्याची काळजी घेणारी महिलाही दिसत आहे. हे फोटो चाहत्यांना भलतेच आवडले असून या फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सैफ- करीनाने खरेदी केली जीप रँग्लर
माध्यमांतील वृत्तांनुसार, काही महिन्यांपूर्वीच सैफ आणि करीना या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेताना दिसले होते. दोघांनीही त्यावेळीच ही गाडी बुक केली होती. मात्र, ते आता ऑक्टोबर महिन्यात ही गाडी घरी घेऊन आले आहेत. सैफ आणि करीनाला ऑफ रोडिंग गाड्यांचा भलताच छंद आहे. दोघेही बऱ्याच काळापासून जीप रँग्लर खरेदी करण्याची योजना बनवत होते. आता त्यांच्या ताफ्यात जीप रँग्लर या गाडीचाही समावेश झाला आहे.

गाडीची किंमत झोप उडवणारी
जीप रँग्लर ही गाडी दोन व्हेरियंटमध्ये येते. गाडीचा पहिला व्हेरियंट 57 लाख रुपयांमध्ये येतो, तर दुसरा 63 लाख रुपयांमध्ये येतो. मात्र, ऑन रोड किंमत वाढून 67 लाख रुपये होते. या गाडीची आपली वेगळी खासियत आहे. ही गाडी अत्यंत आरामदायी आहेच, शिवाय खराब रस्त्यांवरही या गाडीमध्ये काहीच त्रास होत नाही. ही गाडी कदाचित खासकरून ऑफ रोडिंगसाठीच बनवली गेली आहे. सैफ आणि करीना यांनी जीप रँग्लर रूबीकॉन कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 60 लाखांहूनही अधिक आहे.

करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला खास कमाई करता आली नाही. दुसरीकडे, सैफच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा ‘विक्रम वेधा’ सिनेमा 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत ऋतिक रोशन हादेखील मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची किडनी झाली खराब, उपचारासाठी कुटुंबाकडे नाहीयेत पैसे

फेक फोटोंमुळे चर्चेत आले होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, यादीमध्ये आहेत मोठ मोठे अभिनेते

हे देखील वाचा