बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांना कधी कुठल्या समस्याचा सामना करावा लागेल, याचा काही नेम नाही. सध्या ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार सलमान खान याच्या जीवाला धोका आहे. नुकतेच त्याची रेकी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. यामुळे बिश्नोई गँगचा प्लॅन ए अयशस्वी ठरला. मात्र, सलमानला जीवे मारण्यासाठी या गँगने प्लॅन बीदेखील आखल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा पंजाब पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला.
पोलिसांनी सांगितले की, “बिश्नोई गँगने (Bishnoi Gang) सलमान खान (Salman Khan) याच्यावर दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा कट रचला गेला होता. त्यांनी अभिनेत्याला त्याच्याच फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन बनवला होता.” पुढे बोलताना पोलिसांनी सांगितले की, “सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला मारण्याचा दुसरा प्लॅन केला होता. प्लॅन ए अपयशी ठरल्यानंतर बिश्नोई गँगने प्लॅन बी बनवला होता. या प्लॅनचे नेतृत्व गोल्डी ब्रार करत होता. गोल्डीने सलमानची हत्या करण्यासाठी कपिल पंडित (लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर) याची निवड केली होती.” पोलिसांनी कपिलला नुकतेच भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक केले आहे.
प्लॅन बीचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, “पनवेलमध्ये सलमान खानचे फार्महाऊस (Salman Khan Panvel Farmhouse) आहे. त्यामुळे कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर शूटर्स मुंबईच्या वाजे परिसरात पनवेलमध्ये एक भाड्याचे घर घेऊन थांबण्यासाठी आले होते. त्यांनी त्या रस्त्याची रेकी केल्यानंतर ते घर भाड्याने घेतले होते.” पोलिसांनी असेही सांगितले की, जवळपास दीड महिन्यांपर्यंत बिश्नोई गँगचे लोक या खोलीत थांबले होते.
माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले की, लॉरेन्स बिश्नोई गँगला (Lawrence Bishnoi Gang) हेदेखील माहिती होते की, जेव्हापासून सलमानचे नाव ‘हिट एँड रन’ प्रकरणात सलमानचे नाव समोर आले होते, तेव्हापासून तो त्याच्या गाडीचा वेग खूप कमी ठेवतो. त्यांना रेकीदरम्यान हेदेखील समजले होते की, जेव्हाही सलमान त्याच्या फार्महाऊसवर येतो, तेव्हा त्याच्यासोबत बॉडीगार्ड शेराच असतो. त्यामुळेच बिश्नोई गँगच्या सर्व शूटर्सजवळ छोटे हत्यार, पिस्तूल आणि काडतूस होते.
खरं तर, लॉरेन्स बिश्नोईला सलमानची हत्या करून 1998 सालच्या काळवीट हरणाच्या शिकारीचा बदला घ्यायचा आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलीस रिमांडमध्ये स्वत: बिश्नोईने हा खुलासा केला की, त्याने 2018मध्ये सलमान खानच्या हत्येची पूर्ण तयारी केली होती. यासाठी त्याने खास रायफलदेखील खरेदी केली होती. त्यासाठी त्याने 4 लाख रुपये मोजले होते.
सलमान खानबद्दल बोलायचं झालं, तर तो आगामी काळात ‘टायगर 3’, ‘किसी का भाई किसी की जान’ यांसारख्या सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता’ मालिका सोडून ‘या’ कलाकारांनी केली घोडचूक, लोकप्रियतेपासून राहिले दूर
रिचा चड्ढाच्या चाहत्यांनी अली फजल सोडून भलत्याच अलीसोबत बनवली जोडी, अभिनेत्रीने ट्वीटद्वारे दिले उत्तर
‘तो आणि मी…’, पंकज त्रिपाठी यांनी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा