Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘कुत्राही बघायला जात नाही’ म्हणत, सलमानने उडवली ऋतिक रोशनच्या चित्रपटाची खिल्ली, मग पुढे…

‘कुत्राही बघायला जात नाही’ म्हणत, सलमानने उडवली ऋतिक रोशनच्या चित्रपटाची खिल्ली, मग पुढे…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याचा कोणताही चित्रपट आला की, तो हिट होतोच. सलमानसाठी हिंदी चित्रपटसृष्टी एका कुटुंबासारखी आहे. येथे सर्व लोक एकमेकांशी एकोप्याने राहतात आणि बंधुभावाने काम करतात. कारण पुढे जाताना कुणालारी कुणाची तरी गरज भासू शकते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण बॉलिवूडमध्ये ऋतिक रोशन आणि सलमानचे नाते काही खास नाही. दोघांमधील भांडण सुरूच आहे.

ऋतिकच्या चित्रपटाबाबत सलमानने (Salman Khan) वादग्रस्त विधान केल्यावर ऋतिकही भडकला होता. केवळ सलमानच नाही, तर सलमानचा धाकटा भाऊ सोहेल यानेही एकदा ऋतिकविरोधात वादग्रस्त विधान करून त्याची तुलना नवाजुद्दीन सिद्दीकीशी केली होती.

सोहेलने ऋतिकचा केला होता अपमान   

सोहेल खानने ऋतिकची (Hrithik Roshan) तुलना नवाजुद्दीन सिद्दीकीशी करत या दोघांच्या कामाची तुलना केली. यानंतर ऋतिकने सलमानने बोललेल्या शब्दांना प्रत्युत्तर देत आपल्या एका वक्तव्यात सर्वांची मने जिंकली.

ऋतिकने २००० साली ‘कहो ना प्यार हैं’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचे पहिलेच चित्रपट सुपरहिट ठरले. त्यानंतर सलमान नेहमीच त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करत होता. पण सलमानने ऋतिक रोशनच्या ‘गुजारिश’ या चित्रपटावर वादग्रस्त विधान केल्याने या दोघांमधील वाद सुरू झाला. यानंतर ऋतिक रोशनही संतापला.

ऋतिकच्या ’गुजारिश’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. एका कार्यक्रमादरम्यान सलमान खानने या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सलमानने सर्वांसमोर म्हटले होते की, “अरे, त्यात माशी उडत होती पण एकही डास पाहायला गेला नाही, कुत्राही गेला नाही.” सलमाननंतर सलमानचा भाऊ सोहेल खाननेही ऋतिक रोशनवर असेच वक्तव्य केले होते.

सोहेल खान दिग्दर्शित ‘फीकी अली’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने काम केले होते. त्यानंतर खानने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीला हा प्रश्न विचारला की, “तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून डान्सिंग शो पकडणे तुमच्यासाठी किती कठीण होते.” पण नवाजुद्दीन सिद्दीकी बोलण्याआधी सोहेल खान म्हणाला की, “ऋतिक रोशनने त्याच्या डान्सवर १० वर्षे मेहनत केली. तरीही नवाजुद्दीन सिद्दीकी जे करू शकतो ते तो करू शकत नाही.”

दुसरीकडे, ऋतिक रोशनने सलमान खानला कोणतीही टोमणा न मारता, एक साधे उत्तर दिले की, “मी नेहमीच सलमानला एक चांगला व्यक्ती मानत आलो आहे ज्याला मी पाहिलेही आहे आणि कौतुकही केले आहे. पण कोणीही बढाई मारू नये. इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणी किती कष्ट घेतले हे कोणालाच माहीत नाही. असे असूनही कोणी कोणाची चेष्टा केली तर ते त्याला शोभत नाही.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ऋतिक रोशन लवकरच सैफ अली खान आणि राधिका आपटे यांच्यासोबत ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय दीपिका पदुकोणसोबत ‘फाइटर’ चित्रपटात ऋतिक रोशन प्रेक्षकांना दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा