×

‘वायआरएफ’ चित्रपटासाठी शाहरुख-सलमान खान आणि ऋतिक रोशन एकत्र? ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’सारखी मोमेंट करणार शेअर

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी स्पाय ऍक्शन चित्रपट ‘पठाण’ किंवा सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत ऋतिक रोशनने कॅमिओ केल्याची चर्चा बॉलिवूड जगतात आहे. शाहरुख ‘टायगर ३’मध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सलमान ‘पठाण’मध्ये कॅमिओ करत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘वॉर २’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर ऋतिक या प्रोजेक्टमध्ये सामील होणार आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, “ज्यांना ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ च्या स्क्रिप्टची माहिती आहे ते सर्व सांगू शकतात की, ऋतिकचे पात्र कबीर कधीही ‘पठाण’ किंवा ‘टायगर’ला भेटले नसावे. पण, कबीर, पठाण आणि टायगर एकमेकांना भेटतील अशाप्रकारे आदित्य चोप्रा त्याच्या हेरगिरी फ्रेंचायझीची योजना आखत आहे. पण हे ‘वॉर २’ नंतरच शक्य होईल. सुरुवातीपासूनच ही योजना आहे.

आदित्य चोप्राच्या जासूसी चित्रपटामध्ये आहेत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री  

कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांसारख्या बॉलिवूड क्वीन्स सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत काम करत असल्याने आदित्य चोप्राचे चित्रपट खूपच रोमांचक असेल. एका सूत्राने सांगितले की, यशराज फिल्म्स प्रेक्षकांना खास भेट देणार आहे. ज्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील तीन सर्वात मोठे सुपरस्टार एकत्र दिसणार आहेत.

तीन सुपरस्टार्सची भेट असेल ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’च्या मोमेंटसारखी 

‘वॉर २’ चित्रपटावर काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आदित्य चोप्राला माहित आहे की, या तीन सुपर स्पाईसची ऑन-स्क्रीन मीटिंग प्रेक्षकांसाठी ‘ऍव्हेंजर्स एंडगेम’ मोमेंटसारखी असेल जिथे सर्व नायक एकत्र येतात! जोपर्यंत ते घडत नाही तोपर्यंत प्रेक्षक या खास क्षणासाठी उत्सुक असतील!”

योजनेवर काम आहे सुरू

सूत्राने सांगितले की, योजनेवर काम सुरू आहे. सूत्राच्या म्हणण्यानुसार, देशातील तीन मेगास्टारची ही ब्लॉकबस्टर बैठक असेल आणि या योजनेवर कामही सुरू आहे. तो खास क्षण कसा तयार होतो हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना धीराने वाट पाहावी लागेल आणि या चित्रपटांचा आनंद घ्यावा लागेल.

हेही वाचा :

Latest Post