Monday, July 1, 2024

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या मिराबाई चानूला भेटला सलमान खान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले…

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले मेडल मिळवून देणारी खेळाडू म्हणजे मिराबाई चानू. मिराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. याच मिराबाई चानूला नुकतेच सलमान खान भेटला आणि तिने मिळवलेल्या एवढ्या मोठ्या यशाबद्दल तिचे कौतुक केले. या भेटीचे फोटो सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

सलमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे सलमान आणि मिराबाई उभे असून, सलमानच्या अंगावर एक स्कार्फ देखील दिसत आहे. सोबतच दोघांच्या चेहऱ्यावर एकमेकांना भेटल्याचा आनंदही स्पष्ट लक्षात येत आहे. सलमानची फॅन असलेल्या मिराबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद तर ओसंडून वाहत आहे. सलमानने या भेटीचे दोन फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “रौप्य पदक मिळवणाऱ्या मिराबाई चानू यांना खूप खूप शुभेच्छा. खूपच सुंदर, प्रेमळ भेट, तुम्हाला कायम शुभेच्छा.” सलमानने हे फोटो त्याच्या ट्विटवर अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (Salman Khan Meets Olympian Mirabai Chanu)

मिराबाईने सलमानचे ट्वीट रिट्विट करत लिहिले, “खूप खूप धन्यवाद, सलमान सर. मी तुमची खूप मोठी फॅन असून आज तुमची भेट झाल्यामुळे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.” या भेटी दरम्यान मिराबाईने सलमानला त्यांचा पारंपरिक स्कार्फ भेट म्हणून दिला. एका मुलाखतीमध्ये मिराबाईने ती सलमान खानची मोठी फॅन असल्याचे सांगितले होते. मिराबाई चानू ही २०२० च्या टोकियोमध्ये संपन्न झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी पहिली स्त्री होती. तिने २०२ किलोचे वजन उचलून महिलांच्या ४९ किलोच्या भागात रौप्य पदकाची कमाई केली आहे.

याआधी मिराबाई मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील त्याच्या घरी भेटली. मिराबाईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या भेटीचे फोटो पोस्ट करत लिहिले, “तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला.”

सलमान खानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून, सोबतच ‘किक २’ आणि ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; पाहा श्रियाचा हा ‘हटके’ अंदाज

-अभिनेत्री हंसिका मोटवानीने मालदीवमधून बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

हे देखील वाचा