Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड मुंबई पोलिसांच्या ‘या’ कामावर सलमान खान झाला खूश; म्हणाला, ‘बाल तस्करी हा…’

मुंबई पोलिसांच्या ‘या’ कामावर सलमान खान झाला खूश; म्हणाला, ‘बाल तस्करी हा…’

मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथून बाल तस्करी करणाऱ्या प्रकरणाची उकल केली असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी महिलांकडून समजले की, ते मुलीला हैदराबादला घेऊन जात होती, जिथे मुलीचा भीक मागण्यासाठी वापर केला जाणार होता. यामागे आंतरराज्य टोळीचा हात असल्याचेही समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान यानेही या प्रकरणावर मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.

सलमान खानने केले मुंबई पाेलिसांचे काैतुक
अभिनेता सलमान खान (salman khan) याने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “देव मुंबई पोलिसांना आशिर्वाद देवो! तुम्हाला अधिक शक्ती, प्रार्थना आणि आशीर्वाद. बाल तस्करी हा मानवाकडून केलेला सर्वात जघन्य गुन्हा आहे, या गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सर्व बाल मुले शोधून त्यांच्या पालकांकडे परत जावीत, ही प्रार्थना आहे” तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या ट्विटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी लिहिले, “तुमच्या कौतुकाबद्दल धन्यवाद! युनिट 9 ने 1 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी 2 महिलांना अटक केली आहे.”

 

मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सलमान खान विरुद्ध केतन कक्कर (ketan kakkad) याने काही काळापूर्वी त्याच्यावर बाल तस्करीचा आरोप केला होता. इतकेच नाही तर केतनने सलमान खानचे नाव ‘डी गँग’शी जोडले होते आणि दावा केला होता की, अनेक स्टार्सचे मृतदेह त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर दफन केले आहे. ज्यावर सलमान खानने प्रतिक्रिया दिली होती आणि केतन कक्करने त्याची बदनामी करणे थांबवावे, तसेच त्याने सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्यास सांगितले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अती घाई संकटात जाई! इमरजेंसी चित्रपटाच्या सेटवर कंगनाचा घरला पाय अन्…

विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही

हे देखील वाचा