Monday, June 17, 2024

ऐश्वर्या रायने केले प्रेरित, तर सलमान खानने दिला चित्रपटात ब्रेक; जाणून घेऊया अथिया शेट्टीबाबत काही खास गोष्टी

बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड प्रसिद्ध आहेत. परंतु काही स्टारकिड असे आहेत ज्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांचे नाव कमावले आहे. यातीलच एक नाव म्हणजे अथिया शेट्टी. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी असण्यासोबत एक अभिनेत्री देखील आहे. अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने लहानपणापासूनच अभिनयाची तिला आवड होती. तिलाही अभिनय शिकता यावा अशी तिची इच्छा होती. अथिया शुक्रवारी (5 नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर वाढदिवसानिमित्त अथियाबाबत जाणून घेऊया काही गोष्टी.

अथिया शेट्टीचा जन्म 5 नोव्हेंबर 1992 साली मुंबई येथे झाला आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची खूप आवड होती. आपल्या वडिलांप्रमाणे आपल्यालाही अभिनय यावा. त्यांच्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये नाव कमावावे अशी तिची इच्छा होती. त्यासाठी अभिनयातील अनेक गोष्टी शिकण्यासाठी तिने न्यूयॉर्क फिल्म ऍकेडमीमधून तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. (Birthday special : let’s know Athiya Shetty’s unheard things)

अभिनयासोबत तिला डान्सिंगची देखील खूप आवड आहे. तिने डान्स शिकण्यासाठी कोरिओग्राफर रेमो डिसुझा यांच्याकडे ट्रेनिंग घेतली आहे. अथियाला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक सलमान खानने दिला.

अथियाने तिच्या अभिनयातील करिअरची सुरुवात निखिल आडवाणी यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटाचा रिमेक होता. अथियाला ऐश्वर्या रायने चित्रपटात येण्यासाठी प्रेरित केले होते. ती अनेकवेळा सुनील शेट्टीसोबत ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या सेटवर जात असायची तेव्हा ती कितीतरी वेळ ऐश्वर्याचे निरीक्षण करत असायची.

तिने त्यानंतर ‘मुबारक’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचुर चकनाचुर’ या चित्रपटात काम केले. ‘मोतीचुर चकनाचुर’ या चित्रपटात तिच्यासोबत नवाझुद्दीन सिद्दीकी हा मुख्य भूमिकेत होता. 2015 ते 2016 या काळात तिने चार पुरस्कार जिंकले. तिने ‘वोग ब्युटी अवॉर्ड’, ‘स्टारडस्ट अवॉर्ड’, ‘प्रोड्युसर गिल्ड फिल्म अवॉर्ड’ आणि ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म ऍकेडमी अवॉर्ड’ जिंकले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता तु इरिटेट करताेय’, शालीनने केलं सलमानच्या डाेक्याच दही

कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये पोहोचून चाहत्यांना केले आश्चर्यचकित, अभिनेत्याने शेअर केला मजेदार व्हिडिओ

हे देखील वाचा